शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रशियामध्ये पुन्हा पुतीनराज, जगातील सर्वात मोठ्या देशाचे अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 13:29 IST

२०२४ पर्यंत त्यांची ही नवी टर्म असेल. २०२४ साली ते ७१ वर्षांचे असतील.

मॉस्को- आकाराने जगात सर्वात मोठ्या असणाऱ्या देशाच्या प्रमुखपदाची धुरा व्लादिमिर पुतीन यांच्याकडे आली आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीमध्ये पुतीन यांचा विजय झाला असून ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा निवडले गेले आहेत.जवळजवळ २५ वर्षे रशियाची सत्ता सांभळण्याची संधी पुतीन यांना या निमित्ताने मिळाली आहे. २०२४ पर्यंत त्यांची ही नवी टर्म असेल. २०२४ साली ते ७१ वर्षांचे असतील. त्यांच्याआधी जोसेफ स्टॅलिनने रशियाची सत्ता सांभाळली आहे. निवडणुकीतील ७० टक्के मते मोजल्यानंतरच पुतीन विजयी झाल्याचे निश्चित झाले. पुतीन यांना ७५.९ टक्के मते मिळाल्याचे यातून स्पष्ट झाले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी घेतलेल्या निर्णयांवर लोकांनी दाखवलेला विश्वास आहे असा मी या निवडणुकीचा अर्थ लावतो असे रेड स्क्वेअर येथे मतमोजणीनंतर केलेल्या भाषणामध्ये पुतीन यांनी सांगितले.पावशतकापेक्षा अधिक काळ सत्तेत राहाणाऱ्या नेत्यांमध्ये ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोनॉली राखमोन, कॅमेरुनचे पॉल बिय, इक्वेटोरियल गिनीचे तिओदोरो ओबियांग न्गुएमा यांचा समावेश आहे.सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणारे नेतेक्युबा- सर्वाधिक काळ राज्यशकट हाकणाऱ्या यादीत क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांचा क्रमांक सर्वात वरती लागतो. त्यांनी ४९ वर्षे सत्ता उपभोगली. २००८ साली त्यांनी सत्ता आपला भाऊ राऊल याच्याकडे सोपवली.तैवान- तैवानचे पहिले अध्यक्ष चँग कै शैक यांनी ४७ वर्षे सत्तेत राहून दुसरा क्रमांक पटकावला आहे. ते चीनचेही राष्ट्राध्यक्ष होते. त्या कालावधीचाही यात समावेश आहे. १९७५ साली त्यांचा मृत्यू झाला.उत्तर कोरिया- उत्तर कोरियाचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष किम इल सुंग यांनी ४६ वर्षे सत्ता उपभोगली. त्यांचा १९९४ साली मृत्यू झाला. ते आजही कोरियाचे नेते आहेत असे मानले जाते.लिबिया- मुअम्मर गदाफी हे २०११ पर्यंत सलग ४२ वर्षे अध्यक्ष होते. बंडखोरांनी बंड केले नसते तर आणखी काही काळ ते यापदावर राहिले असते.गॅबन- तेलसंपन्न गॅबनचे राष्ट्राध्यक्ष ओमर बोंगो ओडिंबा हे ४१ वर्षे सत्तेत होते. त्यांचा मृत्यू २००९ साली झाला.अल्बानिया- अल्बानियाचे एन्वर होक्सा हे १९८५ साली मृत्यू होईपर्यंत ४० वर्षे सत्तेत होते.झिम्बाम्ब्वे- रॉबर्ट मुगाबे १९८० साली सत्तेत आले ते २०१७ पर्यंत झिम्बाब्वेची सूत्रे सांभाळत होते. ३७ वर्षांनंतर त्यांना स्तता सोडावी लागली. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया