शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
7
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
8
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
9
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
11
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
12
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
13
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
14
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
15
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
16
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
17
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
18
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
19
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
20
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश

पुतिन यांचा जीव आणि गादीलाही धोका? खेरसानमधील पराभवानंतर रशियात खतरनाक मेसेज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 23:57 IST

हा मेसेज अलेक्झांडर डुगिन नावाच्या एका व्यक्तीने टेलिग्रामवर केला आहे.

खेरसानमधील पराभव रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण खेरसानच्या पराभवानंतर, रशियामध्ये टेलिग्रामवर एक अत्यंत खतरनाक मेसेज व्हायरल झाला होता. या मेसेजमध्ये पुतिन यांना सत्तेवरून हटविण्या बरोबरच, त्यांना मारण्यासंदर्भातही भाष्य करण्यात आले होते. हा मेसेज नंतर काढण्यातही आला. मात्र, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रशियामध्ये राष्ट्रपती पुतिन यांच्या विरोधात संतापाची लाट तयार होत आहे का? असा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहत आहे.

शेअर करण्यात आली अशी स्टोरी - हा मेसेज अलेक्झांडर डुगिन नावाच्या एका व्यक्तीने टेलिग्रामवर केला आहे. द मिररच्या रिपोर्टनुसार, त्यांनी या मेसेजमध्ये जेम्स फ्रेजरच्या गोल्डन बो या कथेचा हवाला दिला आहे. या कथेत, राजाला केवळ दुष्काळात पाऊस पाडता न आल्याने मारले जाते. संबंधित वृत्तानुसार, डुगिनने लिहिले आहे, की आपण एखाद्या शासकाला शक्ती देतो, ही शक्ती लोकांना आणि राज्याचे कठीण प्रसंगी संरक्षण करण्यासाठी दिली जाते. मात्र, तो तसे करण्यास असमर्थ असेल, तर हे अत्यंत दुःखद आहे.

मेसेजमध्ये नागरिकांना भडकावले -यानंतर, अलेक्झांडर डुगिन यांनी युक्रेनमधील रशियन सैन्याच्या परिस्थितीसंदर्भात भाष्य केले. त्यांनी लिहिले, स्वत:ला खरा रशियन म्हणवून घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दुःख वाटायला हवे. खेरसनमधील रशियन सैन्याच्या परिस्थितीबद्दल एखाद्या व्यक्तीला दुःख होत नसेल, तरी ती व्यक्ती खर्‍या अर्थाने रशियन नाहीच. एवढेच नाही, तर खेरसानच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती पुतिन आणि रशियन लष्करी अधिकाऱ्यांमध्येही मतभेद असल्याचे समोर येत आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन