शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Vladimir Putin : रशियन परराष्ट्रमंत्र्यानं केलं होतं असं वक्तव्य, पुतिन यांना इस्रायलच्या पंतप्रधानांकडे मागावी लागली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 10:29 IST

यावेळी पुतिन यांनी जर्मन होलोकास्टसंदर्भात बोलण्याची संधी दिल्याबद्दल पीएम नाफ्ताली बेनेट यांचे आभार मानले. तसेच त्यांना इस्रायलच्या स्वतंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. यावर्षी इस्रायल आपला 74वा स्वतंत्र्य दिवस साजरा करत आहे. तसेच बेनेट यांनीही राष्ट्रपती पुतिन यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले.

रशियाचे राष्ट्रपती (Russia) व्लादिमीर पुतिन यांना आपले परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह (Sergey Lavrov) यांच्या एका वक्तव्यामुळे इस्रायलची माफी मागावी लागली आहे. जर्मनी (Germany) चा हुकूमशाह अॅडोल्फ हिटलर (Hitler) हा यहुदी (Jewish) वंशाचा असल्याचे लाव्हरोव्ह यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर इस्रायलने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच, रशियन राजदूताला बोलावून माफी मांगण्यास सांगण्यात आले होते. 

पुतिन यांनी व्यक्त केला खेद -इस्रायलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांनी ट्विट करत म्हटले आहे, की त्यांनी गुरुवारी राष्ट्रपती पुतीन यांना मारिपोल येथील स्टील कारखान्यातून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात विनंती करण्यासाठी फोन केला होता. यावेळी, पुतिन यांनी कारखान्यातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मार्ग देण्यास सहमती दर्शवली. याच वेळी त्यांनी परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांचे वक्तव्य योग्य नसल्याचे म्हणत, खेद व्यक्त केला.

पुतीन यांनी इस्रायलला दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा -यावेळी पुतिन यांनी जर्मन होलोकास्टसंदर्भात बोलण्याची संधी दिल्याबद्दल पीएम नाफ्ताली बेनेट यांचे आभार मानले. तसेच त्यांना इस्रायलच्या स्वतंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. यावर्षी इस्रायल आपला 74वा स्वतंत्र्य दिवस साजरा करत आहे. तसेच बेनेट यांनीही राष्ट्रपती पुतिन यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले.

काय म्हणाले होते लाव्हरोव्ह? -लाव्हरोव्ह म्हणाले होते, हिटलरकडे युक्रेनमध्ये मॉस्कोच्या ऑपरेशनची व्याख्या करण्यासाठी यहुदी वारसा होता. यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांत तणाव दिसून आला. मात्र, असे असले तरी रशिया आणि युक्रेनचे संबंध अत्यंत चांगले आहेत.  

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनIsraelइस्रायलrussiaरशिया