शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई देशांनी जगाचे नेतृत्व करण्यासाठी आध्यात्मिक परंपरेचे निजधन वापरावे- राम नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 10:30 IST

जागतिक मंचावरचे आशियाई देशांचे वाढते महत्त्व लक्षात घेता जगाच्या भल्यासाठी आशियाई देशांनी आपल्याकडे असलेल्या वैचारिक मूल्ये व पर्यावरणीय संस्कृतीच्या संपदेचा सुयोग्य वापर करावा

म्यानमार, दि. 6 - जागतिक मंचावरचे आशियाई देशांचे वाढते महत्त्व लक्षात घेता जगाच्या भल्यासाठी आशियाई देशांनी आपल्याकडे असलेल्या वैचारिक मूल्ये व पर्यावरणीय संस्कृतीच्या संपदेचा सुयोग्य वापर करावा, असं उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक म्हणाले आहेत. राम नाईक यांनी म्यानमारची राजधानी यंगून येथे संवाद या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.दिल्लीतल्या विवेकानंद इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज व जपान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंगून येथे भरलेल्या दोन दिवसीय संमेलनात संघर्ष परिस्थिती टाळा व पर्यावरणीय चेतना या विषयावर भारत, म्यानमार, जपानसहीत अनेक देशांचे नेते, विद्वान व धर्मप्रसारक आपले विचार मांडणार आहे. गौतम बुद्धांनी स्वतःच स्वतःला मार्ग दाखवा असे म्हटले होते. उपनिषदांमध्येही तत्त्व व आत्मा हे सर्वोच्च चेतनेहून भिन्न असल्याचं प्रतिपादनही राम नाईक यांनी केले.राम नाईक म्हणाले, प्राचीन काळापासून म्यानमार व भारताचे सौहार्दाचे संबंध आहेत. ते अधिकाधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश आलंय. समाजाच्या विकासासाठी या दोन्ही देशांना आपापल्या सांस्कृतिक परंपरेचे अधिष्ठान कामी येणार आहे. आज सारे जग पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्राचीन परंपरांचाही उपयोग  होतोय. वसुधैव कुटुंबकम ही विचारधारासुद्धा प्राचीन वैचारिक धन आहे. आज जागतिक पातळीवरही विचारांची गरज आहे. राम नाईक यांनी यावेळी प्राचीन परंपरांचं महत्त्व विषद केलं आहे. या संमेलनात जपानचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान यांचे व्हिडीओ संदेश दाखवण्यात आले आहेत. व्हिएतनाम उपपंतप्रधान, म्यानमारचे सांस्कृतिक मंत्री आदी नेत्यांप्रमाणेच जपान, चीन, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, मंगोलिया, थायलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील मान्यवर सहभागी झाले होते. तत्पूर्वी 3 व 4 सप्टेंबर 2015 रोजी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं होतं.