शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

किम-ट्रम्प भेट; रशियाचे परराष्ट्रमंत्री उद्या उत्तर कोरियाला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 14:49 IST

गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग हो यांनी मॉस्को येथे जाऊन सर्जे लॅव्रोव यांची भेट घेतली होती.

मॉस्को- 12 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची सिंगापूर येथे भेट होणार आहे. मागिल महिन्यात किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे मून जाए इन यांची भेट झाल्यानंतर कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्यावर दोन्ही देशांच्या नेत्यांचे एकमत झाले होते. त्यानंतर कोरियांसदर्भातील विविध घडामोडींना वेग आला आहे.उत्तर कोरियाला अमेरिकन शिष्टमंडळाने भेट दिली तर सिंगापूरलाही दोन्ही देशांच्या उच्चपदस्थ अधिकारी व नेत्यांनी भेट दिली आहे. आता उद्या रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जे लॅव्रोव जाणार आहेत. सर्जे कोरियन नेत्यांशी अणूकार्यक्रम आणि इतर व्दीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग हो यांनी मॉस्को येथे जाऊन सर्जे लॅव्रोव यांची भेट घेतली होती. आता सर्जे उत्तर कोरियाला जात असल्यामुळे उत्तर कोरियातील अणुकार्यक्रमामुळे तयार झालेला तणाव कमी करण्यासाठी मदत होईल असे सांगण्यात येत आहे.अमेरिकेने सध्या उत्तर कोरियावर आर्थिक बंधने लादली आहेत. ही बंधने मागे घेण्यासाठी उत्तर कोरियाने लवकरात लवकर आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत असे अमेरिकेचे मत आहे.

गेल्या आठवड्यात उत्तर कोरियातील अणू चाचणी केंद्राला काही परदेशी पत्रकार भेट देण्यासाठी गेले होते. अणू कार्यक्रम हळूहळू थांबवत असल्याच्या उत्तर कोरियाच्या घोषणेनंतर तेथिल सध्यस्थिती पाहाण्यासाठी हे पत्रकार पोहोचले होते. मात्र अमेरिकन लष्कराबरोबर सराव केल्यामुळे दक्षिण कोरियन पत्रकारांना तेथे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. उत्तर कोरियन सरकारने मर्य़ादित स्वरुपात या अणुचाचणी स्थळाला भेट देण्याची परवानगी दिली. भूमिगत चाचण्या आणि इंटरकॉन्टीनेन्टल बॅलिस्टीक मिसाइलच्या चाचण्या थांबवू असे आश्वासन उ. कोरियाने दिले होते. द. कोरियाने अमेरिकन लष्कराबरोबर युद्धसराव केल्यामुळे उत्तर कोरियाने नुकतेच प्रस्थापित झालेले उच्चस्तरिय संबंध गोठवले. त्यामुळे या पत्रकारांच्या चमूमध्ये द. कोरियन पत्रकारांचा समावेश नाकारण्यात आला होताय उ. कोरियात आलेल्या पत्रकार बीजिंगमधून एका चार्टर्ड विमानातून आले. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि चीन, रशिया या देशांतील पत्रकारांमध्ये समावेश होता.

टॅग्स :Kim-Trump Summit Singaporeकिम-ट्रम्प भेट सिंगापूरrussiaरशियाnorth koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन