शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या मुलीची आईसोबत झाली पुन्हा भेट; कोरियाने आणला 'हा' नवा आविष्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:45 IST

सुरुवातीला आईच्या मनात आपल्या मुलीला जवळ घेण्यासाठी चलबिचल सुरु होती.

नवी दिल्ली - तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण हे खरं आहे की टेक्नोलॉजीच्या सहाय्याने एखाद्या मृत व्यक्तीला तुम्ही भेटू शकता, त्यांच्याशी बोलू शकता. अलीकडेच असा किस्सा कोरियातील एका टेलिव्हिजन शोमध्ये पाहायला मिळाला आहे. 'मिटींग यू' नावाच्या टीव्ही शोमध्ये एक आई तिच्या मुलीला भेटते. या मुलीचा मृत्यू २०१६ मध्ये झाला होता. शोमध्ये आईला तिच्या ७ वर्षीय मुलीला भेटण्यासाठी व्हर्चुअल रिएलिटीचा वापर करण्यात आला. 

या कमाल टेक्नोलॉजीमुळे मृत्यूनंतर ४ वर्षांनी एक आई तिच्या मुलीला भेटते फक्त इतकचं नाही तर आई तिच्याशी संवादही साधला. संवादामध्ये मुलीने तिच्या आईला सांगितले की, तिला सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. आईला आपल्या मुलीचा स्पर्श व्हावा यासाठी टच सेन्सेटिव्ह ग्लव्स आणि ऑडिओचा वापर करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजकांनी आईला मुलीसोबत भेट घडवण्यासाठी वाइव व्हर्चुअल रिएलिटी हेडगियर देण्यात आलं.

त्यानंतर आईला एका गार्डनमध्ये नेण्यात आलं. त्याठिकाणी तिची मुलगी उभी राहून आईकडे पाहत हसत होती. मुलीला इतक्या वर्षाने पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यातून पाणी आलं. आई आणि मुलीची भावूक भेट झाली. यामध्ये मुलीने आईला सांगितलं की, मला तुझी खूप आठवण येते. 

कोरियाची कंपनी Munhwa Broadcasting Corporation ने या मुलीचा चेहरा डिझाईन करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. यामध्ये त्यांनी मृतक मुलीचा चेहरा, शरीर आणि आवाज हूबेहूब ठेवण्यासाठी कसरत केली कारण आईला आपल्या मुलीसोबत असल्याचा पूर्णपणे भास होईल. सुरुवातीला आईच्या मनात आपल्या मुलीला जवळ घेण्यासाठी चलबिचल सुरु होती. त्यानंतर मुलीच्या सांगण्याने आईने तिचा हात पकडला. हात पकडताच आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. हा कार्यक्रम पाहणारे मुलीचे वडील, भाऊ-बहिण यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

थोड्या वेळानंतर या व्हर्चुअल प्रवासाचा शेवट करण्यात आला. मुलीने आईला सांगितले की, मी थकली आहे, मला झोपायचं आहे. ज्यानंतर आईने आपल्या मुलीला निरोप दिला.   

टॅग्स :technologyतंत्रज्ञानTelevisionटेलिव्हिजन