रोमानियातील ड्रागासानी आणि इएसी शहरांदरम्यान झालेल्या एका भयानक रस्ता अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या अपघातात एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला चिरडले, ज्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
व्हिडिओत दिसत आहे की, एका काळ्या रंगाची कार रस्त्याने जात असताना तिच्या विरुद्ध दिशेने येणारा मोठा ट्रक नियंत्रण गमावतो आणि वेगाने घसरत पुढे जातो. कारच्या चालकाला धोका जाणवताच तो ब्रेक लावतो. परंतु, हा ट्रक उलटत कारला चिरडतो. हा अपघात इतका भीषण होता की, कार मधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातातून ट्रक चालक आश्चर्यकारकरित्या बचावतो, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, अशी माहिती आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनेची माहिती मिळताच १३ अग्निशमन दलाच्या गाड्या, अनेक पोलीस अधिकारी आणि रुग्णवाहिका पथके तातडीने घटनास्थळी पोहोचले. गाडीच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर करावा लागला. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाची अल्कोहोल चाचणी केली, जी निगेटिव्ह आली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपासाला सुरू केला.
Web Summary : A horrific accident in Romania involving a truck losing control and crushing a car resulted in two fatalities. Police are investigating the incident, where the truck driver tested negative for alcohol.
Web Summary : रोमानिया में एक भयानक दुर्घटना में एक ट्रक अनियंत्रित होकर एक कार को कुचल दिया, जिसमें दो लोगों की मौत हो गई। पुलिस मामले की जांच कर रही है, ट्रक चालक का अल्कोहल टेस्ट नेगेटिव आया।