शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

US Capitol: डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा कॅपिटल बिल्डिंगमध्ये धूडगूस, गोळीबारात एका महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 07:55 IST

US Capitol: वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देट्रम्प यांचे समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहनहिंसाचारात एका महिलेचा मृत्यू, अनेक जण जखमी

वाशिंग्टन : २०२० मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अद्याप राजकीय पेच सुरूच आहेत. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांच्याकडून निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करत दबाव आणला जात होता. यातच आता डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी (Donald Trump supporters) व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडेन (Joe Biden) यांनी  ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावे आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावे", असे जो बायडेन म्हणाले. याचबरोबर, कॅपिटल बिल्डिंगमध्ये जो गोंधळ आपण पाहिला आहे, ते आम्ही नाही आहोत. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे, असे जो बायडेन यांनी सांगितले.

हिंसाचारात एका महिलेचा मृत्यू, अनेक जण जखमीनिवडणुकीच्या निकालाबाबत अमेरिकेच्या संसदेच्या बोलावलेल्या बैठकीपूर्वी ट्रम्प समर्थकांची गर्दी व्हाइट हाऊस आणि अमेरिकन कॅपिटल इमारतीच्या बाहेर जमा झाली आहे. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगमध्येही गोंधळ केली आहे. यावेळी पोलीस आणि सर्मथकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये या हिंसाचारात एका महिलेचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती आहे. वॉशिंग्टन डीसी पोलीस प्रमुखांनी सांगितले की, कॅपिटलमध्ये एक महिलेला गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. तर या हिंसाचारात अनेक अधिकारी जखमी झाले आहेत. 

ट्रम्प यांचे समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहनडोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा पक्षात आहोत.

फेसबुकने हटविला ट्रम्प यांचा व्हिडीओट्विटरनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ फेसबुकने डिलीट केला. दरम्यान, अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. "आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविला आहे, कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरु असलेल्या हिंसाचार कमी करण्याऐवजी प्रोत्साहन देत होता," असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका