शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 19:44 IST

Japan Airport Bomb Explosion: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या अमेरिकन बॉम्बचा बुधवारी जपानच्या विमानतळावर अचानक स्फोट झाला.

Japan Airport Bomb Explosion: जपानमधीलविमानतळावर एका अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट झाला. स्फोटामुळेविमानतळाच्या टॅक्सीवे वर मोठा खड्डा पडला. यामुळे येथे ८० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. या स्फोटात कोणीही जखमी झाले नसल्याचे जपानी अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण-पश्चिम जपानमधील मियाझाकी विमानतळावर बॉम्बस्फोट झाला. तेव्हा तेथे कोणतेही विमान नव्हते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेल्फ डिफेन्स फोर्सेस आणि पोलिसांनी केलेल्या तपासात असे दिसून आले की हा स्फोट ५०० पौंड वजनाच्या अमेरिकन बॉम्बमुळे झाला. मात्र, या घटनेतून सध्या कोणालाही कोणताही धोका नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून अचानक स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे.

स्फोटामुळे ८० हून अधिक उड्डाणे रद्द

एव्हिएशन स्कूलमधून रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये हा अपघात दिसत आहे. स्फोटामुळे डांबराचे तुकडे कारंज्याप्रमाणे हवेत उडाल्याचेही  मारताना दिसले. जपानी मीडियानुसार, प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये टॅक्सीवेमध्ये खोल खड्डा दिसत आहे. त्यानंतर लगेचच जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी सांगितले की विमानतळावरील ८० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एका दिवसाच्या अंतराने ऑपरेशन्स पुन्हा सुरू होतील.

टॅग्स :JapanजपानBombsस्फोटकेBlastस्फोटAirportविमानतळAmericaअमेरिका