शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना; Video जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:23 IST

Maharaja ranjit singh statue in lahore : पुतळ्याची तोडफोड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानातील लाहोर किल्ल्यावर महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. आतापर्यंत तिसऱ्यांदा या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. पुतळ्याची विटंबना करणारा व्यक्ती हा तेहरिक-ए- लब्बैक पाकिस्तान या पाकिस्तानी पक्षाचा असल्याची माहिती मिळत आहे. पुतळ्याची तोडफोड करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती हाताने पुतळ्याची तोडफोड करताना दिसत आहे. तोडफोड करणाऱ्या व्यक्तीने पुतळ्याचे हात तोडले आणि नंतर पुतळा घोड्यावरून खाली पाडला. 

महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याजवळ विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. तेवढ्यात एका व्यक्तीने त्याला पकडून पुतळ्याची तोडफोड करण्यापासून थांबवलं. दरम्यान, यापूर्वीही दोनदा या पुतळ्याची तेहरिक-ए- लब्बैक पाकिस्तानच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. "हा अतिशय लाजिरवाणा प्रकार असून हा निरक्षर लोकांचा समूह जगातील पाकिस्तानच्या प्रतिमेसाठी खरोखरच धोकादायक आहे" असं हुसैन यांनी म्हटलं आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देखील एका व्यक्तीने पुतळ्यावर हल्ला केला होता. पुतळ्याचा हात तोडला होता. तसेच आणखी नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता. पण लोकांनी त्याला वेळीच पकडलं एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात मंदिराला निशाणा बनवण्यात आलं होतं. पंजाब प्रांतातील सादिकाबाद जिल्ह्यातील भोंग शरीफ गावात असलेल्या गणेश मंदिरात काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मंदिरामध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयितांसह 50 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेत आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते.

पाकिस्तानातील हिंदू मंदिरात तोडफोड; 50 जणांना अटक, 150 जणांविरोधात गुन्हा दाखल 

लाहोरपासून 590 किमीवर असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरामध्ये जमावाने हिंदू मंदिरावर हल्ला केला होता. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या आधारे मुख्य आरोपीसह 50 जणांना अटक करण्यात आली. मंदिरात तोडफोड झाल्याची घटना लाजिरवाणी असल्याची भावना प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी व्यक्त केली. अशाच प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल, असे ते म्हणाले. मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रमाणात काही लोकं मंदिराच्या आत लाठी-काठ्या घेऊन शिरले होते. त्यानंतर मंदिरात तोडफोड सुरू केली होती.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक डॉ. शहबाज गिल यांनी ट्वीट करत ही घटना अतिशय दु:खद आणि खेदजनक असल्याचं म्हटलं होतं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान