तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (24 डिसेंबर) दक्षिण-पूर्व तैवानपासून ते राजधानी तैपेईपर्यंत हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 6.1 एढी मोजली गेली. या धक्क्यां नी मोठ-मोठ्या इमारतीही हदरल्या. दरम्यान, आपला जीव वाचवण्यासाठी लोकांनी घरांतून आणि कार्यालयांमधून बाहेर धाव घेतली.
दोन वेगवेगळे धक्के -तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासन आणि जागतिक भूकंप निरीक्षण संस्तेने दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या तीव्रतेचे दोन भूकंप झाले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, पहिला धक्का ५.७ तीव्रतेचा होता, या धक्क्याने राजधानी तैपेईसह आसपासच्या परिसरातील इमारती हादरल्या.
तैतुंग काउंटीमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप -तैवानच्या आग्नेय किनाऱ्यावर असलेल्या तैतुंग काउंटीमध्ये भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला, हा पहिल्या धक्क्या पेक्षा अधिक तिव्रतेचा होता. याची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल एवढी होती. महत्वाचे म्हणजे, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून केवळ 10 किलोमीटर खाली होता. हे अंतर कमी असल्याने, भूकंपाचे धक्के अधिक जाणवले. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या धक्क्यांमुळे इमारती काही सेकंदांपर्यंत हलत होत्या.
दिलासादायक गोष्ट म्हणजे, अद्याप कसल्याही प्रकारच्या जिवित अथवा वित्तहाणीचे वृत्त नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पथके तयार आहेत.
तत्पूर्वी, एप्रिल २०२४ मध्ये तैवन ७.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरला होता. जो गेल्या २५ वर्षांतील सर्वात मोठा भूकंप होता. त्यावेळी किमान 17 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, हुलिएन भागात, मोठ्या प्रमाणावर भूस्खलनासह इमारतींचे मोठे नुकसान झाले होते.