शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: मिस्टर मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांना हाक मारुन बोलवतात तेव्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 19:27 IST

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मोदींचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

नवी दिल्ली - प्रत्येक भारतीयाच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोकशाही मूल्यांची प्रशंसा केली. पंतप्रधान हे जी-७ शिखर परिषदेसाठी दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यांवर असून त्यांचे रविवारी म्युनिकमध्ये आगमन झाले. म्युनिक येथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर, आज ते परिषदेसाठी हजर राहिले असता मोदींचे आणि भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभाव दिसून आला. विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मोदींचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मोदींचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हस्तांदोलन करण्यासाठी चक्क पाठिमागून येऊन त्यांना बोलवताना दिसत आहेत. मोदींच्या खांद्यावर हात ठेवून ते मोदींना बोलवतात, त्यानंतर मोदी पाठिमागे वळून पाहतात आणि जो बायडन यांच्या हातात हात देतात. पंकजा मुंडेंनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, आपल्या मातीवर प्रेम.. गरिबांची सेवा आणि समभाव. जागतिक पातळीवर देशाभिमान आणि प्रभाव.. असे कॅप्शनही पंकजा यांनी दिले आहे.   अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणजे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती असं मानलं जातं. त्यात, या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी अनेकांना महिनोंमहिने वाट पाहावी लागते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हस्तांदोलन करण्यासाठी ते स्वत: धावून आले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर, भाजप समर्थकांकडून मोदींचा जागतिक पातळीवर होत असलेला प्रभाव म्हणून शेअर करण्यात येत आहे.

भारत ही लोकशाहीची जननी

ऑडी डोम इनडोअर एरिनामध्ये आयोजित एका कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ४७ वर्षांपूर्वी लोकशाहीला ओलीस ठेवणे आणि लोकशाही तुडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणीबाणी भारताच्या चैतन्यपूर्ण लोकशाहीवरील काळा डाग आहे. आम्हा भारतीयांना लोकशाहीचा अभिमान वाटतो. भारत लोकशाहीची जननी आहे, असे प्रत्येक भारतीय गर्वाने म्हणू शकतो. भारताने रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावेळी घेतलेली भूमिका, तसेच कोविड काळात जगातील अनेक देशांना केलेली मदत. यामुळे अमेरिकेलाही भारताचा हेवा वाटत आहे. त्यातूनच जो बायडन यांनाही मोदींच्या भेटीची ओढ लागली असावी. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPankaja Mundeपंकजा मुंडेMumbaiमुंबईJoe Bidenज्यो बायडनGermanyजर्मनी