शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रणगाड्यांसह घुसले, विध्वंस घडवला अन्...; हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचा सर्जिकल स्ट्राइक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 14:26 IST

Israel Hamas War - इस्रायली लष्कराने हमासला संपवण्यासाठी नवा उपाय शोधला आहे. इस्रायलच्या ग्राऊंड फोर्सने उत्तर गाझा पट्टीत घुसून हमासची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केली.

7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने गाझाला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. मात्र, जमिनीवरील कारवाईसाठी लष्कराकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. अशा स्थितीत इस्रायली लष्कराने हमासला संपवण्यासाठी नवा उपाय शोधला आहे. इस्रायलच्या ग्राऊंड फोर्सने उत्तर गाझा पट्टीत घुसून हमासची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केली. एवढेच नाही तर हा सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर इस्रायली सैन्यही आपल्या सीमेवर परतलं आहे. इस्रायली आर्मी रेडिओने हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान ही सर्वात मोठी घुसखोरी असल्याचं म्हटलं आहे. लष्कराने या कारवाईचा व्हिडिओही जारी केला आहे. यामध्ये इस्त्रायली सैनिक चिलखती वाहनांतून गाझा सीमेवर कसे घुसले आणि रणगाड्यांमधून हमासच्या अनेक स्थानांवर हल्ला केला हे पाहता येईल. यामध्ये एन्टी टँक मिसाईल लॉन्च पोस्टचा समावेश होता.

इस्रायलच्या हल्ल्यात अनेक उद्ध्वस्त इमारतीही दिसत आहेत. हल्ला केल्यानंतर इस्रायली रणगाडे परतले. युद्धाच्या पुढील टप्प्याच्या तयारीसाठी ही घुसखोरी करण्यात आल्याचे लष्कराने निवेदनात म्हटले आहे. इस्रायली सैन्याने हमासला नष्ट करण्याचा हा संदेश होता. मात्र, याबाबत हमासकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

हमास आणि इस्लामिक जिहाद या पॅलेस्टिनी संघटनांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला होता. या हल्ल्यात 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हमास आणि इस्लामिक जिहादने अजूनही 220 नागरिकांना ओलीस ठेवले आहे.

या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून गाझा पट्टीवर इस्रायलचा जोरदार बॉम्बफेक सुरूच आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 6500 लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे की यापैकी 2700 मुलं होती. त्याचबरोबर 17000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल