अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष हळूहळू वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले सुरू झाल्यानंतर इराणनेही हल्ले वाढवले आहेत. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण खवळला असून, इस्रायलबरोबर अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष्य करत आहे. इराणने अमेरिकेचे एफ १५ हे लढाऊ विमान कुवैतमध्ये पाडले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
इस्रायल-अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत हाहाकार उडाला आहे. इराणने इस्रायलवर हल्ले करण्याबरोबरच शेजारी देशातील अमेरिकेचे हवाई तळे आणि दूतावासांनाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. हा लष्करी संघर्ष विकोपाला गेला असून, इराणच्या हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे.
कुवैतमध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान पाडले
जगातील सर्वात घातक लढाऊ विमानांपैकी एक असलेले एफ १५ हे विमान पाडण्यात आले. इराणने हे विमान पाडल्याची माहिती आहे. कुवैतमध्ये हे विमान पाडण्यात आले असून, विमान खाली कोसळतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत.
विमान हवेत असतानाच मिसाईल वेध घेते आणि लढाऊ विमान एफ १५ हे गिरक्या घेत खाली कोसळताना दिसत आहे. सुदैवाने या विमानातील वैमानिक बचावला आहे. इराणकडून हे विमान पाडल्याचा दावा केला जात असला, तरी याला कुवैत वा अमेरिकेने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
अमेरिकेचे इराणच्या हवाई तळांवर हल्ले
अमेरिकेकडून इराणच्या हवाई तळांवर हल्ले केले जात आहे. इराण अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचे व्हिडीओही जारी केले गेले आहेत. अमेरिकेने मागील दोन दिवसात २ हजारांहून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले असून, इराणकडून अमेरिकेच्या लढाऊ विमानांना लक्ष्य केले जात आहे.
Web Summary : Amid escalating conflict, Iran claims to have shot down a US F-15 fighter jet in Kuwait. This follows increased attacks between Iran, America, and Israel, raising concerns about regional stability after their leader's death. Kuwait and the US have not confirmed the incident.
Web Summary : बढ़ते संघर्ष के बीच, ईरान ने कुवैत में एक अमेरिकी एफ-15 लड़ाकू विमान को मार गिराने का दावा किया है। यह ईरान, अमेरिका और इज़राइल के बीच हमलों के बाद क्षेत्रीय स्थिरता के बारे में चिंताओं को बढ़ाता है। कुवैत और अमेरिका ने घटना की पुष्टि नहीं की है।