शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 08:29 IST

हॅमंटन सिटी एअरपोर्टच्या वर ही दुर्घटना घडली. सकाळी ११:२५ च्या सुमारास दोन एनस्ट्रॉम बनावटीची हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली.

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एक अत्यंत भीषण विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण न्यू जर्सीच्या आकाशात दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकल्याने एका पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा पायलट गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, त्यात एक हेलिकॉप्टर वेगाने जमिनीच्या दिशेने कोसळताना दिसत आहे.

भरवस्तीत आगीचे लोळ आणि घबराट 

मिळालेल्या माहितीनुसार, हॅमंटन सिटी एअरपोर्टच्या वर ही दुर्घटना घडली. सकाळी ११:२५ च्या सुमारास दोन एनस्ट्रॉम बनावटीची हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली. धडक इतकी जोरात होती की, एका हेलिकॉप्टरने पेट घेतला आणि ते थेट जमिनीवर कोसळले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग विझवली. या दोन्ही विमानांत केवळ पायलटच स्वार होते. दुर्घटनेत एकाचा जागीच अंत झाला, तर दुसऱ्या गंभीर जखमी पायलटवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

काय होते अपघाताचे कारण? 

अपघाताच्या वेळी हवामान स्वच्छ होते आणि दृश्यता देखील चांगली होती, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तरीही ही धडक कशी झाली, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, बहुतेक हवाई अपघात हे एकमेकांना पाहण्यात किंवा अंदाज घेण्यात आलेल्या अपयशामुळे होतात. एखाद्या वैमानिकाला 'ब्लाइंड स्पॉट'मुळे दुसरे विमान दिसले नसावे का? या दृष्टीनेही तपास केला जात आहे.

तपासासाठी विशेष पथक तैनात 

हॅमंटन पोलीस प्रमुख केविन फ्रियल यांनी सांगितले की, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्ड या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत. दोन्ही पायलटमधील संवाद तपासला जाणार आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही वैमानिकांना एकमेकांचे विमान दिसत होते का, की तांत्रिक बिघाडामुळे ही धडक झाली, याचा शोध आता घेतला जाईल. न्यू जर्सीच्या या शांत भागात घडलेल्या या घटनेने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. विमान उड्डाण नियमांकडे झालेले दुर्लक्ष या अपघाताला कारणीभूत आहे का, हे आता चौकशीनंतरच स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Helicopter Collision in New Jersey: Mid-Air Crash Caught on Camera

Web Summary : A New Jersey mid-air helicopter collision resulted in one pilot's death and another's injury. The crash occurred near Hammonton City Airport. Investigations are underway to determine the cause, focusing on pilot visibility and potential mechanical failure. The incident has sparked concern across America.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाAmericaअमेरिका