शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: तलावात बोटिंग करताना अंगावर पडला हजारो टन वजनी खडक; 7 जणांचा मृत्यू तर 20 बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 15:40 IST

ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यात शनिवारी ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे.

रिओ दि जेनेरो:ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यात शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. तलावात बोटिंग  करणाऱ्या पर्यटकांवर भला मोठा मोठा खडक पडला. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 32 जण जखमी झाले. याशिवाय 20 जण बेपत्ता आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. 

मिनास गेराइस अग्निशमन दलाचे कमांडर कर्नल एडगार्ड एस्टेवो डी सिल्वा यांनी या घटनेची माहिती दिली आहे. एस्टेवो डी सिल्वा यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 7 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर 32 लोक जखमी झाले आहेत. 20 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात फर्नेस तलावावर लोक बोटीवरुन जात असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान दगडाचा मोठा भाग तुटून बोटींवर पडला.

पावसामुळे झाला अपघात

मिनास गेराइसचे गव्हर्नर रोमू झेमा यांच्या म्हणण्यानुसार, कॅपिटोलियोमधील फर्नास तलावातील खडकाचा काही भाग मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. जेम्मा यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आम्ही लोकांना आवश्यक संरक्षण आणि मदत देण्यासाठी काम करत राहू. बेपत्ता लोकांचा शोध सुरूच राहील. ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, नौदलाने शोध आणि बचाव कार्यासाठी टीम तैनात केली आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयBrazilब्राझीलAccidentअपघात