कॅराकस : व्हेनेझुएला देश संभाव्य दिवाळखोरीपासून ४८ तास दूर असून, ही दिवाळखोरी टळली नाही, तर त्यातून उभ्या राहणा-या १२० अब्ज डॉलरच्या वित्तीय संकटाचा फटका जगातील अनेक देशांना बसण्याची भीती आहे.‘कॉर्पोइलेक’ व ‘पेट्रोलेआॅस’ या व्हेनेझुएलाच्या सरकारी वीज व तेल कंपन्यांनी पूर्वी सरकारी हमीने आणलेल्या कर्जरोख्यांची व्याजासह परतफेड करण्याची वाढीव मुदतही सोमवारी संपत आहे. या कंपन्यांनी मुद्दल व व्याजाची परतफेड केलेली नाही.राष्ट्राध्यक्ष निकोलास मडुरो यांनी दिवाळखोरी टाळण्यासाठी कर्जाची फेररचना करण्याचा प्रस्ताव देताना उपराष्ट्राध्यक्षांची समिती नेमली आहे. धनकोंनी समितीपुढे जायला नकार दिल्यास, व्हेनेझुएला सरकारही दिवाळखोरीत गेल्यासारखे होईल. अमेरिकेने व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.भारताच्या ओएनजीसीलाही या संभाव्य दिवाळखोरीचा फटका बसू शकतो. गेल्या सहा महिन्यांत पेट्रोलेआॅस कंपनीने ओएनजीसीला कर्जरोख्यांच्या परतफेडीपोटी एक पैसाही दिलेला नाही. (वृत्तसंस्था)
व्हेनेझुएला दिवाळखोरीकडे, कर्जाची फेररचना करण्याचा प्रस्ताव, ओएनजीसीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 04:07 IST