शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:01 IST

पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान युद्धविराम चर्चा सुरू असताना, शनिवारी पोप यांनी सेंट पीटर्स बॅसिलिका येथे एका प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांनी युद्धाचे समर्थन करणाऱ्या आणि लष्करी श्रेष्ठतेचा उदोउदो करणाऱ्या प्रवृत्तींवर नाव न घेता टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पोप यांच्यावर निशाणा साधला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टीकेला पोप लिओ XIV यांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले. "आपण ट्रम्प प्रशासनाला घाबरत नाही. शांती आणि सलोख्यासाठी व्हॅटिकनने केलेले आवाहन हे पूर्णपणे 'गॉस्पेल'वर (धर्मग्रंथ) आधारित आहे, असे त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, ते अमेरिकन वंशाचे आहेत.

अल्जीरियाला जाताना 'एपी' वृत्तसंस्थेशी बोलताना पोप लिओ म्हणाले, माझ्या संदेशाची तुलना राष्ट्राध्यक्षांनी येथे जे करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्याशी करणे, मला वाटते, हे 'गॉस्पेल'चा संदेश न समजणे आहे आणि हे ऐकून मला दुःख वाटले. मात्र, मी आज जगात चर्चचे जे मिशन मानतो, ते काम मी पुढेही सुरूच ठेवेन.

पोप पुढे म्हणाले, "मला कोणत्याही वादात पडायचे नाही. माझ्या बोलण्याचा उद्देश कुणावरही हल्ला करण्याचा नाही. मी गॉस्पेलचा संदेश देण्यापासून आणि सर्वांना शांतता आणि सलोख्याचा मार्ग शोधण्यासाठी आणि शक्य असेल तेव्हा युद्ध टाळण्यासाठी आमंत्रित करत राहीन."

काय म्हणाले होते ट्रम्प? - या वादाची सुरुवात रविवारी झाली, ट्रम्प यांनी पोप यांच्यावर जोरदार हल्ला चढवत म्हटले होते,  "आपल्याला असे वाटत नाही की, कॅथोलिक चर्चच्या मुळच्या अमेरिकन असलेल्या या वैश्विक नेत्याचे काम फार चांगले आहे आणि ते फारच उदार व्यक्ती आहेत." एवढेच नाही तर, त्यांनी 'कट्टर डाव्यांचा' पक्ष घेणे बंद करावे, असा सल्लाही ट्रम्प यांनी त्यांना दिला होता." याशिवाय, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर असेही लिहिले होते की, "जर मी व्हाईट हाऊसमध्ये नसतो, तर लिओ व्हॅटिकनमध्ये नसते. त्यांनी राजकारणी न होता एक महान पोप बनण्यावर लक्ष द्यावे, यामुळे कॅथोलिक चर्चचे नुकसान होत आहे."

अशी पडली वादाची ठिणगी -पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान युद्धविराम चर्चा सुरू असताना, शनिवारी पोप यांनी सेंट पीटर्स बॅसिलिका येथे एका प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांनी युद्धाचे समर्थन करणाऱ्या आणि लष्करी श्रेष्ठतेचा उदोउदो करणाऱ्या प्रवृत्तींवर नाव न घेता टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पोप यांच्यावर निशाणा साधला होता.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pope Responds to Trump: 'Not Afraid!' Vatican-White House Clash Explained

Web Summary : Pope Leo XIV rebuked Trump's criticism, asserting the Vatican's peace efforts are gospel-based. He expressed sadness at Trump's misunderstanding but vowed to continue promoting peace and avoiding war. The spat began after Trump criticized the Pope's perceived liberal stance and questioned his leadership.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पPopeपोपWarयुद्धIranइराणIsraelइस्रायल