वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ:यापूर्वी अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत म्हणून भारतीय वंशाचे रिचर्ड राहुल वर्मा यांचे नामांकन करण्यात आले आहे. सिनेटने मंजुरी दिल्यास भारतातील या प्रमुख अमेरिकी मुत्सद्दी पदावर नियुक्त होणारे ते पहिलेच भारतीय ठरतील.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इतर अनेक प्रशासकीय नियुक्त्यांसह वर्मा यांचे गुरुवारी रात्री नामांकन केले. वर्मा यांनी यापूर्वी सहायक परराष्ट्रमंत्री (संसदीय व्यवहार) म्हणून काम केले असून, ते सध्या खासगी क्षेत्रत कार्यरत आहेत. राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी राजीनामा दिल्यापासून नवी दिल्लीतील अमेरिकी राजदूतपदाची जागा रिक्त आहे. सध्या ही जबाबदारी कॅथलीन स्टीफन्स सांभाळत आहेत. सिनेटचे बहुसंख्याक नेते हॅरी रीड यांच्याकडे 2क्क्2 ते 2क्क्7 दरम्यान ते वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व परदेश धोरण सल्लागार म्हणून कार्यरत होते.
वर्मा हे ओबामा त्याचप्रमाणो माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचे विश्वासू आहेत. सध्या ते स्टेपटो अॅण्ड जॉन्सन एलएलपी व अलब्राईट स्टोनब्रीज ग्रुपमध्ये वरिष्ठ सल्लागार असून, ते सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसमध्ये वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत.