शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 19:49 IST

हॉटेल असोसिएशन नेपाळने एक निवेदन जारी करून सांगितलं की, या आंदोलनांदरम्यान २० पेक्षा जास्त हॉटेल्सचं मोठं नुकसान झालं.

नेपाळची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे आणि यात हॉटेल उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. पण, अलीकडेच झालेल्या आंदोलनांमुळे या क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या हिंसक निदर्शनांदरम्यान देशभरातील सुमारे दोन डझन हॉटेल्सना लक्ष्य करण्यात आलं, ज्यामुळे २५ अब्ज नेपाळी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. या हिंसेने केवळ मालमत्तेचंच नुकसान झालं नाही, तर हजारो लोकांच्या नोकऱ्यांवरही टांगती तलवार आहे.

हॉटेल उद्योगावर आंदोलनांचा परिणाम!'माय रिपब्लिका' या नेपाळी न्यूज पोर्टलच्या अहवालानुसार, हॉटेल असोसिएशन नेपाळने एक निवेदन जारी करून सांगितलं की, या आंदोलनांदरम्यान २० पेक्षा जास्त हॉटेल्सचं नुकसान झालं. या हॉटेल्समध्ये तोडफोड, लूट आणि जाळपोळ झाली. यामुळे हॉटेल उद्योगाला २५ अब्ज नेपाळी रुपयांपेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागलं.

हिल्टन हॉटेलला सर्वाधिक फटकाकाठमांडूमधील हिल्टन हॉटेल या हिंसाचारात सर्वाधिक प्रभावित झालं आहे. HANच्या माहितीनुसार, एकट्या या हॉटेलमध्ये ८ अब्ज रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. काठमांडू व्यतिरिक्त पोखरा, बुटवल, भैरहवा, झापा, बिराटनगर, धनगडी, महोत्तरी आणि दांग-तुलसीपूर यांसारख्या शहरांमधील नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉटेल्सनाही हिंसाचाराचा फटका बसला.

हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकटया आंदोलनात ज्या हॉटेल्सचं नुकसान झालं आहे, त्यांची दुरुस्ती केल्याशिवाय पुन्हा काम सुरू करणं कठीण आहे. याचा थेट परिणाम या हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या २०००हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर होणार आहे.

असोसिएशनने पुढे सांगितलं की, या नुकसानीमुळे हॉटेल्सना बँका आणि इतर वित्तीय संस्थांचं कर्ज फेडणं कठीण जाईल. 'हे नुकसान इतकं मोठं आहे की, हॉटेल उद्योगाशी संबंधित लोक त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकणार नाहीत.' या घटनांची चौकशी करण्यासाठी न्यायिक समिती स्थापन करावी, दोषींना शिक्षा द्यावी आणि प्रभावित व्यवसायांना नुकसानभरपाई जाहीर करावी अशी मागणी असोसिएशनने सरकारकडे केली आहे.

सरकारकडून आर्थिक मदतीची मागणीहॉटेल असोसिएशन नेपाळने सरकारला हॉटेलची दुरुस्ती करण्यासाठी आणि पुन्हा उभारणीसाठी आर्थिक मदत पॅकेज देण्याची विनंती केली आहे. पर्यटन उद्योगाचा विकास आणि देशाची आर्थिक स्थिरता टिकवण्यासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं असोसिएशनने सांगितलं. नेपाळच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा सुमारे ७% आहे आणि परकीय चलनाचाही तो एक मोठा स्रोत आहे. कोरोना महामारीनंतर नेपाळचा हॉस्पिटॅलिटी सेक्टर सावरण्याचा प्रयत्न करत होता, पण या आंदोलनांमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

टॅग्स :Nepalनेपाळagitationआंदोलनbusinessव्यवसायhotelहॉटेल