शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

युट्युबच्या प्रिमीयम सेवांसाठी आता युजर्सला मोजावे लागणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 14:21 IST

युट्युबने आता आपल्या ग्राहकांसाठी प्रिमीयम सेवा लाँच केल्या असून यात युजर्ससाठी दोन स्वतंत्र प्लॅन सादर करण्यात आले आहेत. 

युट्युबने आता आपल्या ग्राहकांसाठी प्रिमीयम सेवा लाँच केल्या असून यात युजर्ससाठी दोन स्वतंत्र प्लॅन सादर करण्यात आले आहेत. खरं तर, युट्युबवर ऑक्टोबर २०१५ पासूनच युट्युब रेड या नावाने प्रिमीयम सेवा सुरू आहे. तथापि, याशिवाय युट्युब अजून एक नवीन सेवा सुरू करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून युट्युबने एका ब्लॉग-पोस्टच्या माध्यमातून यावर शिक्कामोर्तब केले आहे. यात युट्युब प्रिमीयम या नावाने नवीन पेड सेवा सुरू करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी ग्राहकाला दरमहा ११.९९ डॉलर्स मोजावे लागणार आहेत. यामुळे आता युट्युब रेड ही सेवा समाप्त होणार असून याचेच रूपांतर युट्युब प्रिमीयममध्ये करण्यात आले आहे. अर्थात यात काही नवीन फिचर्सची जोड देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत आता ग्राहकाला युट्युब ओरिजनल्स पाहता येणार आहे. यात दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट, डॉक्युमेंटरीज आदींचा समावेश असेल.

दरम्यान, यासोबत युट्युब म्युझिक ही नवीन सेवादेखील सुरू करण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार ही म्युझिक स्ट्रीमिंग सेवा होय. याच्या अंतर्गत ग्राहकाला जाहिराती नसलेल्या संगीताचा आनंद घेता येणार आहे. युट्युबवर असणार्‍या लक्षावधी गाण्यांच्या खजिन्यातून ग्राहकाला हवे ते ऐकता येणार आहे. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप आणि डेस्कटॉपसाठी प्लेअर लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकाला ऑफलाईन असतांनाही संगीत ऐकण्याची सुविधा दिलेली आहे. आगामी काळात गुगल प्ले म्युझिकचा यामध्ये विलय होऊ शकतो. युट्युब प्रिमीयम सेवा घेणार्‍यांना याचा लाभ घेता येणार आहे. मात्र कुणालाही ही सेवा स्वतंत्र हवी असल्यास महिन्याला ९.९९ डॉलर्सची आकारणी करण्यात येणार आहे. सध्या या दोन्ही सेवा अमेरिकेसह अन्य काही राष्ट्रांमध्ये लाँच करण्यात आला आहेत. भारतात याला आगामी कालखंडात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे. 

टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञानonlineऑनलाइन