शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

US Visa: माझ्या अमेरिकेच्या व्हिसाची मुदत संपली असल्यास तो मी कसा रिन्यू करू शकतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 11:29 IST

मुदत संपलेल्या अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करायची असल्यास दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. व्हिसाची मुदत संपून ४८ महिने उलटून गेलेत की नाही, यावरून अर्ज प्रक्रिया बदलते.

प्रश्न: माझ्या अमेरिकेच्या व्हिसाची मुदत संपली असल्यास तो मी कसा रिन्यू करू शकतो?

उत्तर: याचं उत्तर तुमच्या व्हिसाची मुदत कधी संपली त्यावर अवलंबून आहे.

जर तुमच्या व्हिसाची मुदत गेल्या ४८ महिन्यांत संपली असेल तर:

या परिस्थितीत तुम्ही मुलाखत सवलतीसाठी अर्ज करू शकता. याच अर्जाला 'ड्रॉप बॉक्स' अर्ज म्हणतात.

भारतातील सर्व दूतावासात आता नॉनइमिग्रंट व्हिसा प्रकारातील मुलाखत सवलतींचे अर्ज स्वीकारले जात आहेत. बी१/बी२ आणि आरएस वगळता सर्व व्हिसांच्या नुतनीकरणाचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. गेल्या ४८ महिन्यांत मुदत संपलेल्या व्हिसाच्या नुतनीकरणासाठीचे अर्ज देशभरातील व्हिसा अर्ज केंद्रांवर घेतले जात आहेत. मुलाखत सवलतीसाठी पात्र ठरू शकणाऱ्यांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा असं आम्ही सुचवतो. मुलाखत सवलतीसाठी पात्र ठरणाऱ्या अर्जदारांनी त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा अर्जाशी संबंधित कागदपत्रं साहित्य आमच्या ड्रॉप बॉक्समध्ये जमा करण्यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी. तुम्ही मुलाखत सवलतीसाठी पात्र असल्यास ड्रॉप बॉक्स लोकेशन्सची संपूर्ण यादी पाहण्यासाठी http://www.ustraveldocs.com/in/ या संकेतस्थळावर जा आणि कागदपत्रं जमा करण्यासाठी अपॉईंटमेंट निश्चित करा.

मागणी जास्त असल्यानं आणि भारतीय दूतावासातील सर्वसामान्य सेवा तात्पुरती बंद असल्यानं सध्या मर्यादित अपॉईंमेंट मिळत आहेत. अनेक जण अपॉईंटमेंट घेत असल्यानं तुम्हाला पुढील तारीख मिळू शकते. तशी सुविधा यंत्रणेत उपलब्ध आहे.

मुलाखत सवलतीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी काही बाबी ध्यानात ठेवायला हव्यात. आपण अध्यक्षीय घोषणेत येत नाही किंवा राष्ट्राच्या हितार्थ करण्यात आलेल्या घोषणेस अपवाद ठरतो यासाठीची कागदपत्रं अर्जासोबत जोडायला हवीत. मुलाखत सवलतीचा अर्ज दाखल करताना व्हीएसीकडून तुम्हाला एक चेकलिस्ट दिली जाते. त्यावेळी ही माहिती तुमच्या अर्जात जोडण्याची आठवण तुम्हाला करून देण्यात येते.

अध्यक्षीय घोषणा लागू होत नसलेल्या श्रेणी आणि सध्याच्या प्रवास निर्बंधात अपवाद ठरू शकणाऱ्या व्यक्तींनी कृपया https://travel.state.gov/content/travel/en/News/visas-news/presidential-proclamation-on-the-suspension-of-entry-as-nonimmigrants-of-certain-additional-persons-who-pose-a-risk-of-transmitting-coronavirus-disease-2019.html या संकेतस्थळाला भेट द्यावी.

तुमच्या व्हिसाची मुदत संपून ४८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला असेल तर... 

तुम्ही नव्या व्हिसासाठी अर्ज करून मुलाखत द्यायला हवी. नव्या व्हिसाच्या अर्जासाठी आणि मुलाखतीची वेळ निश्चित करण्यासाठी कृपया https://ustraveldocs.com/in/nonimmigrant-visa.html संकेतस्थळाला भेट द्यावी.

तुम्हाला या प्रक्रियेदरम्यान कोणतीही शंका असल्यास कृपया support-india@ustraveldocs.com वर मेल करा.

महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा