शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अमेरिकन व्हिसासाठीच्या मुलाखतीपासून सूट मिळेल की नाही, याची माहिती कशी उपलब्ध होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 13:11 IST

US visa interview waiver: वैयक्तिक मुलाखतीपासून सवलत मिळावी यासाठीच्या पात्रतेचे निकष जाणून घ्या

प्रश्न: माझ्या व्हिसाची मुदत संपली आहे. मी मुलाखतीपासून सूट मिळवण्यास पात्र ठरेन याची माहिती मला कशी मिळेल?उत्तर: भारतातील सर्व दूतावास विभाग सर्व नॉनइमिग्रंट व्हिसा प्रकारातील मुलाखतीपासून सवलत देणारे अर्ज व्हिसा अर्ज केंद्रांच्या माध्यमातून स्वीकारत आहेत. मुलाखत सवलतीमुळे काही व्हिसा अर्जदारांना वैयक्तिक मुलाखतीतून सूट (US visa interview waiver) देण्याबद्दल विचार होतो.नॉनइमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना वैयक्तिक मुलाखतीपासून (इन-पर्सन इंटरव्ह्यू) सवलत देण्याचा अधिकार दूतावासातील अधिकाऱ्यांना आहे. राज्याच्या सचिवांना होमलँड सिक्युरिटी विभागाचा सल्ला घेऊन या अधिकाऱ्यांच्या अधिकारांत वाढ केली आहे. ३१ मार्च २०२१ पासून गेल्या २४ महिन्यांत व्हिसाची मुदत संपलेल्या व्यक्तींना मुलाखतीपासून सवलत दिली जात आहे. त्याआधी १२ महिन्यांपूर्वी व्हिसाची मुदत संपलेल्या व्यक्तींनाच सूट दिली जात होती. यामुळे दूतावासातील अधिकाऱ्यांना नॉनइमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना काहींना दूतावासात मुलाखतीसाठी न बोलावण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे दूतावासातील कर्मचारी आणि इतर अर्जदारांना होऊ शकणारा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येतो.एखाद्या अर्जदाराला मुलाखतीपासून सवलत मिळेलच याची खात्री देता येत नाही. याचे सर्वाधिकार दूतावासातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुलाखतीपासून सूट देताना खालील निकषांचा विचार केला जातो.- नूतनीकरणासाठी करण्यात आलेला अर्ज मागील व्हिसाच्या प्रकारातला असायला हवा.- मागील व्हिसा भारतात १ जानेवारी २००८ च्या नंतर जारी करण्यात आलेला असावा.- मागील व्हिसा चोरीला गेलेला, हरवलेला, रद्द झालेला किंवा काढून घेतलेला नसावा.- मागील व्हिसा वैध असावा किंवा त्याची मुदत गेल्या २४ महिन्यांत संपलेली असावी. (नोट: ३१ मार्च २०२१ नंतर यासंदर्भातील नियम बदलू शकतात.)- शेवटचा व्हिसा जारी झाल्यानंतर अर्जदाराचा कोणत्याही प्रकारातील अर्ज फेटाळला गेलेला नसावा.- मागील व्हिसावर 'मंजुरी मिळाल्याची' टिप्पणी करण्यात आलेली नसावी.- ब्लँकेट एल१ व्हिसा अर्जदार मुलाखतीतील सवलतीसाठी पात्र ठरत नाहीत. पण ब्लँकेट एल२ जोडीदार यासाठी पात्र ठरतात.- अर्जदार एफ व्हिसासाठी अर्ज करत असल्यास, विद्यार्थी सारख्याच अभ्यासक्रमाच पुढील शिक्षण घेत असावा. मग तो दुसऱ्या संस्थेत शिकत असला तरीही हरकत नाही किंवा त्याच शिक्षण संस्थेत दुसरा अभ्यासक्रम शिकत असावा.- अर्जदार जे व्हिसासाठी अर्ज करत असल्यास, मागील व्हिसावर नोंद असलेल्या संस्थेनंच सध्याचा डीएस-२०१९ जारी करायला हवा. त्यावरील स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टिम (SEVIS) क्रमांक आधी जारी करण्यात आलेल्या व्हिसाप्रमाणेच असायला हवा.

१४ वर्षांखालील मुलांसाठी असलेले निकष खालीलप्रमाणे-- अर्जदारानं तिच्या किंवा त्याच्या १४ व्या वाढदिवसाच्या आधी अर्ज करायला हवा. १४ वर्षांखालील मुलांनी त्यांच्या पासपोर्ट बायोग्राफिक माहितीची फोटोकॉपी आणि दोन्ही पालकांची अमेरिकेतील प्रवासाशी संबंधित वैध कागदपत्रं जमा करावीत.

७९ वर्षांवरील व्यक्तींसाठी असलेले निकष खालीलप्रमाणे-- अर्जदारानं तिच्या किंवा त्याच्या ८० व्या वाढदिवसानंतर आधी अर्ज करावा.- त्यांचा सर्वात शेवटचा व्हिसा अर्ज रद्द झालेला नसावा.

मुलाखतीतून सवलत मिळवणाऱ्या व्यक्तीनं तिचे पासपोर्ट आणि व्हिसा अर्जासाठीची कागदपत्रं व्हिसा ऍप्लिकेशन सेंटरमध्ये (व्हीएसी) जमा करण्यासाठी अपॉईंटेमेंट घ्यायला हवी. मुलाखतीपासून सूट मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती देशातील कोणत्याही व्हीएसीकडून अपॉईंटमेंट घेऊ शकतात. मात्र त्यांनी घरापासून जवळच्या सेंटरची निवड करावी असं आम्ही सुचवतो.

तुम्ही मुलाखतीपासून सूट मिळवण्यासाठी पात्र आहात का ते तपासून पाहण्यासाठी http://www.ustraveldocs.com/in/ ला भेट द्या. देशातील ड्रॉप ऑफ लोकेशन्सची यादी आणि ड्रॉप-ऑफसाठी अपॉईंटमेंट तुम्हाला या संकेतस्थळावर मिळेल.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाVisaव्हिसा