शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Coronavirus : अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीची घेतली चाचणी; 45 जणांवर प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 8:05 AM

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या प्रयोगाचं कौतुक केलं असून, लवकरच ही लस जगभरात विकसित केली जाईल, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. 

ठळक मुद्देजगभरात कोरोना व्हायरसनं अक्षरशः थैमान घातलं आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनंही याला महारोगराई घोषित केलं आहे. या भयंकर रोगानं जगभरात आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतही 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीचं परीक्षण घेण्यास सुरुवात केली असून, सोमवारी पहिल्या व्यक्तीवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे.

वॉशिंग्टनः जगभरात कोरोना व्हायरसनं अक्षरशः थैमान घातलं आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनंही याला महारोगराई घोषित केलं आहे. या भयंकर रोगानं जगभरात आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतही 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीचं परीक्षण घेण्यास सुरुवात केली असून, सोमवारी पहिल्या व्यक्तीवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या प्रयोगाचं कौतुक केलं असून, लवकरच ही लस जगभरात विकसित केली जाईल, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. चीनमधलं वुहान हे कोरोना व्हायरसचे केंद्रबिंदू असून, 141 देशांमध्ये व्हायरसनं हातपाय पसरले आहेत. विशेष म्हणजे चीनलाही या रोगावर निश्चित लस किंवा औषध विकसित करता आलेलं नाही. डॉ. जॅक्सन यांच्या मते, कोरोना व्हायरससारखी आपत्ती दूर ठेवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणे गरजेचं आहे. ओळख उघड न करण्याच्या अटीवर 45 कोरोनाबाधित रुग्णांना या प्रयोगासाठी निवडण्यात आलं असून, त्यांना टप्प्याटप्प्यानं ही लस देण्यात येणार आहे. या लसीचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी डॉक्टर घेत आहेत. सोमवारी एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. त्यानंतर आता आणखी तीन लोकांना ही लस देण्यात येणार आहे. या 45 लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. या लसीचा सर्वांवर पडणाऱ्या प्रभावाचं निरीक्षण केलं जात आहे.  या लसीला  mRNA-1273 हे कोडनाव देण्यात आलं आहे. अमेरिकाच नव्हे, तर देशसुद्धा कोरोनावर लस विकसित करण्याचे प्रयत्न करत आहेत. यात रशिया, चीन आणि दक्षिण कोरियाचाही समावेश आहे. या प्रयोगासाठी 18 ते 55 वय वर्ष असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. यांच्या रक्ताचा नमुना तपासून लसीचा कोणताही दुष्परिणाम झाला आहे की नाही, याची चाचपणी केली जाणार आहे. खरं तर ही लस रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी आहे. डॉक्टरांनी या लसीनं रुग्णाला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाAmericaअमेरिका