शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...तरीही चीननं आपल्या लोकांना देशाबाहेर पाठवलं; अमेरिकेचा चीनवर 'गंभीर' आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 12:34 IST

अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 88,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील साथीला चीनला जबाबदार धरले आहे.

वॉशिंग्टन: कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या गंभीर जोखमीची चिनी सरकारला माहिती होती. असे असूनही त्यांनी आपल्या लोकांना देशाबाहेर जाऊ दिले, असं म्हणत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनला शिक्षा देण्यासाठी भविष्यातील रणनीती ठरवतील, असेही ते म्हणाले. आदल्या दिवशी ट्रम्प म्हणाले होते की, त्यांना अद्याप आपल्या चीनच्या नेतृत्वाशी बोलण्याची इच्छा नाही. त्यानंतरच पोम्पिओ यांचे विधान समोर आल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 88,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील साथीला चीनला जबाबदार धरले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर दबाव वाढताचगेल्या अनेक आठवड्यांपासून चीनवर कारवाई करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांवर दबाव वाढत होता. खासदार आणि विचारवंत म्हणतात की, चीनच्या निष्क्रियतेमुळे कोरोना विषाणू वुहानपासून जगभर पसरला आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले की, त्यांना सध्या चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलायचे नाही. माझे जिनपिंगशी संबंध चांगले आहेत, पण सध्या त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

गेल्या काही दिवसांपूर्वी चीनच्या राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठमधून लीक झालेल्या डेटानुसार चीनमध्ये एकूण 6.4 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. लीक झालेल्या डेटामध्ये देशातील 230 शहरांमधील 6.4 लाख लोकांना कोरोना झाला असल्याची माहिती आहे. यामध्ये कोणत्या तारखेला प्रथम रुग्ण आढळून आला होता. तसेच फेब्रुवारी ते एप्रिलपर्यतच्या किती जणांना कोरोनाची लागण झाली आहे, याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालय, निवासी अपार्टमेंट्स, हॉटेल, सुपरमार्केट, रेल्वे स्थानक, शाळा आणि अगदी केएफसी या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याची माहिती या डेटामध्ये देण्यात आली आहे.

चीनमध्ये 6. 4 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ही संख्या जास्त किंवा कमी देखील असू शकते.  राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाने हा डेटा कसा गोळा केला याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र  विविध सार्वजनिक संसाधनांची मदत घेत माहिती गोळा केली असल्याचा दावा विद्यापाठाकडून करण्यात येत आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार

Coronavirus: चीनविरोधात जगातील ६२ देशांनी आखला ‘चक्रव्यूह’; कोरोनाला जबाबदार आढळल्यास...

Lockdown 4.0: जाणून घ्या, तुमच्या विभागात दुचाकी, ऑटो, बस, टॅक्सी सेवा सुरु होणार? वाचा नियम!

इस्राइलमधील राजकीय अनिश्चितता संपुष्टात, नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदी, मोदींनी दिल्या शुभेच्छा

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या