शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 19:29 IST

इवांका ट्रम्प न्यूज नावाच्या हँडलवरून अमेरिकन जनतेला निवडणुकीसंदर्भात एक खास अपील करण्यात आली आहे...

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पनेही एन्ट्री केली आहे? आपल्या वडिलांच्या निवडणूक प्रचारापासून आतापर्यंत दूर राहिलेल्या इवांका ट्रम्पच्या नावाने, मतदानाच्या अगदी काही वेळ आगोदरच करण्यात आलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. कारण, इवांका ट्रम्प न्यूज नावाच्या हँडलवरून अमेरिकन जनतेला निवडणुकीसंदर्भात एक खास अपील करण्यात आली आहे.

प्रचारापासून दूर असलेल्या इवांका अचानक चर्चेत - दीर्घकाळ मौन आणि निवडणूक प्रचारापासून दूर राहिलेल्या इवांका ट्रम्प यांची अचानक व्हायरल झालेल्या पोस्टची जगभरात चर्चा होत आहे. कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी, म्हणजेच अगदी काही तास आधी इवांका ट्रम्प यांच्या नावाने समोर आलेली पोस्ट मथळ्याचा भाग बनली आहे. या पोस्टमध्ये एका प्री-पोल सर्व्हेच्या पोस्टरसह, "2024 च्या निवडणुकीत ट्रम्प विजयी होतील, असा विश्वास आपल्याला असेल, तर येथे हार्ट द्या"

इवांका ट्रम्पचे दुसरे हँडल आणि पोस्ट बघून लोकांच्या मनात शंका - इवांका ट्रम्प यांचे एक्सवरील दुसरे हँडल आणि पोस्टमधील कंटेट पाहून अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. यानंतर इवांका ट्रम्प न्यूज नावाचे ब्ल्यू टिक असलेले व्हेरिफाइड एक्स हँडल डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग असू शकतो, असे बोलले जात आहे. कारण यावर जवळपास सर्वच पोस्ट अमेरिकन निवडणूक आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराशी संबंधित आहे. इवांका ट्रम्प यांच्या आधीच्या व्हेरिफाइड अकाउंटवर त्यांच्या 43 वर्षांच्या होण्यासंदर्भातील एक वैयक्तिक पोस्ट देखील दिसत आहे.

 

टॅग्स :AmericaअमेरिकाUS ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIvanka Trumpइवांका ट्रम्प