शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

ज्यो बायडन यांच्यावर महाभियोग चालणार, प्रस्तावाला मंजुरी; काय आहे नेमकं प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 10:37 IST

महाभियोग प्रस्तावाबाबत ज्यो बायडन यांनी रिपब्लिकन पक्षावर निशाणा साधला आहे.

अमेरिकेतून मोठी राजकीय घडामोड आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. संसदेत ज्यो बायडन यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावाच्या समर्थनार्थ २२१ मते पडली, तर विरोधात २१२ मते पडली. दरम्यान, ज्यो बायडन यांच्यावर त्यांचा मुलगा हंटर बायडन यांच्या वादग्रस्त आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या आधारे औपचारिक महाभियोगाची चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाने हा निर्णय निराधार असल्याचे म्हटले आहे.

रिपब्लिकन पक्षाने अद्याप राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या विरोधात कोणतेही खरे तथ्य मांडलेले नाही. महाभियोगाचा कोणताही फायदा होणार नाही, कारण अमेरिकन संसदेचे वरचे सभागृह सिनेटमध्ये जाताच हा प्रस्ताव पडू शकतो. तेथे डेमोक्रॅट पक्षाची संख्या अधिक आहे. दरम्यान, असे असले तरी महाभियोग प्रस्ताव २०२४ च्या निवडणुकीत ज्यो बायडन यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो.

दरम्यान, महाभियोग प्रस्तावाबाबत ज्यो बायडन यांनी रिपब्लिकन पक्षावर निशाणा साधला आहे. या महाभियोग प्रस्तावाला एक राजकीय स्टंट असल्याचे सांगत ज्यो बायडन यांनी निराधार असल्याचे म्हटले आहे. ज्यो बायडन म्हणाले की, देश आणि जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्राधान्यक्रमांवर कारवाई करण्यासाठी अमेरिकन लोकांना काँग्रेसमधील त्यांच्या नेत्यांची गरज आहे. युक्रेन आणि इस्रायलला त्यांच्या संबंधित संघर्षांच्या संदर्भात निधी रोखल्याबद्दल त्यांनी रिपब्लिकनवर टीका केली. तसेच सीमा सुरक्षा मजबूत करण्यास समर्थन न दिल्याचा आरोपही केला आहे.

याचबरोबर, रिपब्लिकन पक्षाने युक्रेन आणि इस्रायलला पाठवण्यात येणारा निधी रोखल्याचा आरोप ज्यो बायडन यांनी केला. ते म्हणाले की, मंगळवारी मी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. ते रशियन आक्रमणाविरुद्ध स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या लोकांचे नेतृत्व करत आहेत. आमची मदत मागण्यासाठी ते अमेरिकेत आले होते. तरीही रिपब्लिकन मदतीसाठी पुढे जात नाहीत. आम्हाला दक्षिण सीमेवरील परिस्थितीकडे लक्ष द्यावे लागेल. मी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यास वचनबद्ध आहे. सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी आम्हाला निधी गरज आहे. परंतु, संसदेत रिपब्लिकन मदतीसाठी कार्य करणार नाहीत, असे म्हणत ज्यो बायडन यांनी रिपब्लिकन खासदारांवर टीका केली.

हंटर बायडन यांच्यावर १.४ मिलियन डॉलर कर चोरीचा आरोप राष्ट्रध्यक्ष ज्यो बायडन यांचा मुलगा हंटर यांच्यावर युक्रेन आणि चीनमधील व्यावसायिक व्यवहारांमध्ये कुटुंबाच्या नावावर प्रभावीपणे व्यापार केल्याचा आरोप आहे. हंटर बायडन यांच्यावर १.४ मिलियन डॉलर कर चुकवल्याचा आरोप आहे. तसेच, हंटर हे आलीशान जीवनशैली जगण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करत आहेत, असा आरोप आहे. यावर हंटर बायडन यांनी बुधवारी वॉशिंग्टनमध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे वडील माझ्या व्यवसायात आर्थिकदृष्ट्या गुंतलेले नाहीत. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय