शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

व्हाईट हाऊस सजले! बायडन यांच्या नातीचा लग्नसोहळा; दिलं होतं अपघातातील मृत मुलीचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:17 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांची नात नाओमी बायडन पीटर नीलशी 19 नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे.

अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये लवकरच लग्नसोहळा रंगणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांची नात नाओमी बायडन पीटर नीलशी 19 नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला. विशेष म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये याआधी 18 लग्न झाली आहे. पण ही पहिलीच वेळ आहे जेव्हा आता असलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या नातीच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं आहे. या शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. 

28 वर्षीय नाओमी बायडन ही राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांची मुलगी आहे. चार वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये एका मित्राच्या माध्यमातून नाओमीची नीलसोबत ओळख झाली होती. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करायला लागले आणि आता दोघांनीही लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या नाओमी आणि नील हे दोघेही बायडन यांच्या कुटुंबासह व्हाईट हाऊसमध्येच राहत आहे.

नाओमीची आजी आपल्या लाडक्या नातीच्या लग्नासाठी खूप जास्त उत्सुक आहेत. सर्व बारीकसारीक गोष्टींवर त्या लक्ष ठेवून आहेत. नाओमी बायडन ही वकील आहे. ज्यो बायडन यांनी नाओमीचं नाव हे आपल्या मुलीच्या नावावरून ठेवलं आहे. त्यांच्या मुलीचं अपघातात निधन झालं होतं. नाओमीचं आपल्या आजोबांवर खूप प्रेम असून ती त्यांना प्रेमाने पॉप्स असं म्हणते. युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलवेनियामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये तिने ग्रॅज्युएशन केलं आहे. तसेच कोलंबिया लॉ स्कूलमध्येही शिक्षण घेतलं आहे. आता लग्नामुळे तिची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाmarriageलग्न