शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सज्जन, भारतात येण्यास उत्सुक, डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुतिसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 10:58 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. मोदी सज्जन व्यक्ती असून, माझे चांगले मित्र आहेत. गुजरातमधील अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमाबाबतही त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती व्हाइट हाऊसनं दिली होती. मोदींनी सांगितलं होतं की, विमानतळापासून अहमदाबादच्या न्यू स्टेडियम(मोटेरा स्टेडियम)पर्यंत आमच्याकडे लाखो लोक तुमचं स्वागत करणार आहेत. अमेरिका आणि भारताची सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ट्रम्प हा दौरा करत आहेत. तसेच भारतीय लोकांशी मजबूत आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याचाही या दौऱ्याचा उद्देश आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापारी आणि संरक्षण कराराला अंतिम स्वरूप दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यापूर्वीच अमेरिकेची संरक्षण संस्था लॉकहीड मार्टिनकडून 2.6 अब्ज डॉलर्समध्ये 24 एमएच -60 आर सीहॉक हेलिकॉप्टर खरेदीस मान्यता देण्याच्या विचारात आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये ह्युस्टनमधल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात ट्रम्प मोदींबरोबर मंचावर दिसले होते, त्यावेळी मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही भारतात आमंत्रित केलं होतं. त्यावेळीच मोदी म्हणाले होते, ट्रम्प यांचा भारत दौरा दोन्ही देशांच्या स्वप्नांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीसुद्धा भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी