शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्याशी कोणी वाद घालू शकत नाही"; भारतावर टेरिफ आकारण्यावर डोनाल्ड ट्रम्प ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:21 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या मुद्द्यावरुन भारताबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

Donald Trump Tariff Wars : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने सगळ्या जगाची चिंता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी शेजारच्या कॅनडा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर २५ टक्के टेरिफ लागू केला आहे. ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी चीनवरही १० टक्के अतिरिक्त टेरिफ लागू केला. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प भारतावर टेरिफ आकारण्यावर ठाम आहेत. कोणीही माझ्याशी वाद घालू शकत नाही, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर समान आयात शुल्क आकारण्यावर ठाम आहेत. अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यासोबतच्या एका मुलाखतीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनच्या करांमधून भारताला वगळले जाणार नाही, असं म्हटलं आहे. यावेळी ट्रम्प यांनी जागतिक व्यापार आणि अमेरिकाच्या भागीदारांसाठी असलेल्या कर रचनेच्या बदलाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. 

तसेच ट्रम्प यांनी नुकत्याच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टेरिफच्या मुद्द्यावर झालेल्या संभाषणाचाही उल्लेख केला. वॉशिंग्टनच्या परस्पर शुल्कातून भारताला सोडले जाणार नाही,  भारत जेवढे शुल्क आकारते तेवढेच अमेरिकेकडूनही आकारले जाईल असं ट्रम्प म्हणाले.

"मी काल पंतप्रधान मोदींना सांगितले की जसं तुम्ही करणार तसंच मीही करेन. तुम्ही जे काही शुल्क आकाराल ते मीही आकारेन," असं ट्रम्प म्हणाले. यावर पंतप्रधान मोदींनी मला ते आवडणार नाही, असं म्हटलं. यावर उत्तर देत, "तुम्ही जे काही शुल्क आकारता, ते शुल्क मी आकारणार आणि मी प्रत्येक देशासोबत तेच करत आहे," असं ट्रम्प म्हणाले.

यावेळी मस्क यांनी भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर भारतात १०० टक्के शुल्क आहे, असं म्हटलं. यावेळी मस्क यांनी ऑटोमोबाईल क्षेत्राचाही उल्लेख केला. यावर ट्रम्प यांनी हे खूप जास्त असल्याचं म्हटलं. जर अमेरिकन कंपन्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प उभारले नाहीत तर अशा करांमुळे भारतात विक्री करणे अशक्य होईल, असं म्हटलं. "माझ्याशी कोणीही वाद घालू शकत नाही. जर मी २५ टक्के म्हंटले तर ते म्हणतील ते भयंकर आहे असं म्हणतील. पण मी आता असे म्हणणार नाही. कारण ते जे काही शुल्क आकारतात तेच आम्ही आकारणार आहोत," असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, भारताशी टेरिफवरून वाद घालण्याची ट्रम्प यांनी ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्काचा उल्लेख करून भारताला टेरिफ किंग असं म्हटलं होतं. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत