Donald Trump on Iran: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला असून, इराणसाठी ही शेवटची संधी असल्याचे म्हटले आहे. इंधन वाहतुकीसाठी महत्त्वाची असलेल्या होमुर्झची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. जर त्यांनी हे मान्य केले नाही, तर इराणला अशा विनाशाला सामोरे जावे लागेल की ते पुन्हा पाषाण युगात पोहोचतील, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
'मी १० दिवस दिले, आता वेळ संपली'
या प्रकरणावर बोलताना ट्रम्प म्हणाले, "हा अत्यंत कठीण काळ आहे. इराणने ७ दिवसांची मुदत मागितली होती, पण मी त्यांना १० दिवस दिले. आता त्यांच्याकडे फक्त उद्यापर्यंतचा वेळ आहे. त्यानंतर काय होईल हे संपूर्ण जग पाहेलच. या युद्धामुळे अनेक लोक प्रभावित झाले आहेत, पण उद्या रात्री ८ नंतर त्यांच्याकडे कोणतेही पूल उरणार नाहीत, पॉवर प्लांट शिल्लक नसतील. इराण थेट पाषाण युगात जाईल."
४७ वर्षांचा प्रश्न मार्गी लावल्याचा दावा
ट्रम्प यांनी दावा केला की, २८ फेब्रुवारी रोजी जेव्हा हा संघर्ष सुरू झाला, तेव्हा इराण अत्यंत शक्तिशाली होता. पण, आता अमेरिकेने इराणचे कंबरडे मोडले आहे. "जे काम गेल्या ७ अध्यक्षांनी गेल्या ४७ वर्षांत करायला हवे होते, ते मी करत आहे. मला हे करायला आवडत नाहीये, पण हे खूप आधीच व्हायला हवे होते," असेही त्यांनी म्हटले.
आमच्यावर बॉम्ब टाकत राहा; इराणच्या जनतेची मागणी?
यावेळी ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला. ते म्हणाले की, खुद्द इराणमधील नागरिक अमेरिकेला बॉम्बफेक सुरू ठेवण्याची विनंती करत आहेत. "आम्हाला अनेक मेसेज मिळाले आहेत, ज्यात तिथलेच लोक आमच्यावर बॉम्ब टाकत राहा, असं म्हणत आहेत. ज्या भागात बॉम्बस्फोट होत आहेत, तिथलेच हे लोक आहेत, कारण त्यांना त्यांच्या या सरकारपासून स्वातंत्र्य हवे आहे. ते अशा हिंसक जगात राहत आहेत, जिथे निषेध केल्यावर थेट गोळ्या घातल्या जातात."
Web Summary : Trump issued Iran a final ultimatum to reopen the Strait of Hormuz by Tuesday night, or face devastating consequences, potentially returning them to the Stone Age. He claimed Iran's power is broken and that he's resolving a 47-year issue.
Web Summary : ट्रम्प ने ईरान को होर्मुज जलडमरूमध्य खोलने के लिए मंगलवार रात तक का अंतिम अल्टीमेटम दिया, नहीं तो पाषाण युग में जाने की धमकी दी। उन्होंने दावा किया कि ईरान की ताकत टूट गई है और वह 47 साल पुराना मुद्दा सुलझा रहे हैं।