वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना दूरध्वनी केला असून, भारत व पाकिस्तान यांच्यात सध्या चाललेले आरोप-प्रत्यारोप व तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. शेजारी देशात कोणतेही समज-गैरसमज असता कामा नयेत, असे केरी यांनी शरीफ यांना सांगितले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी मी आज बोललो, भारत-पाक यांच्यात सध्या वाढलेल्या तणावाबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली. भारत-पाकमधील या वादामुळे सर्वांनाच तीव्र चिंता आहे, असे केरी यांनी पत्रकारांना सांगितले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाज शरीफ यांना फोन करून रमजाननिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर लगेचच केरी यांचा फोन आला. या दूरध्वनी संवादात शरीफ यांनी सावध पवित्रा घेतला व आताच मी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी बोललो असे सांगितले.
भारत-पाक तणावाने अमेरिका चिंतित
By admin | Updated: June 18, 2015 01:39 IST