शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन नेव्हीचा पहिल्यांदाच मोठा खुलासा; UFOचे अनेक व्हिडीओज, पण जगाला दाखवू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 15:50 IST

यूएस सरकारची वेबसाइट ब्लॅक व्हॉल्टने यूएस नेव्हीला माहिती स्वातंत्र्य कायदा (एफओआयए) विनंती करून सर्व यूएफओचे व्हिडिओ जाहीर करण्याची विनंती केली होती.

अमेरिकेच्या नौदलाने पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. परग्रहावरील युएफओंचे आपल्याकडे अनेक व्हिडीओ असून ते जगाला दाखवू शकत नाही, असे नौदलाने म्हटले आहे. युएफओंना अमेरिकी सरकार अनआयडेंटिफाईड एरिअल फेनॉमेना म्हणते. ही युएफओ जगभरात लँड होत असतानाचे व्हिडीओ आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. 

व्हिडिओ जारी केल्याने त्यांच्या देशाला धोका पोहोचू शकतो, असे अमेरिकी नौदलाला वाटत आहे. यामुळे त्यांना UFO व्हिडिओंशी संबंधित रहस्ये लपविण्यामध्येच हित असल्याचे वाटत आहे. 2020 मध्ये, यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने यूएफओचे तीन व्हिडिओ जारी केले होते. यातील काही क्लिपिंग कोणत्या ना कोणत्या माध्यमात लीक झाल्या होत्या. त्यामुळे नौदलाला हे व्हिडिओ सार्वजनिक करणे भाग पडले होते. 

यूएस सरकारची वेबसाइट ब्लॅक व्हॉल्टने यूएस नेव्हीला माहिती स्वातंत्र्य कायदा (एफओआयए) विनंती करून सर्व यूएफओचे व्हिडिओ जाहीर करण्याची विनंती केली होती. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नौदलाने एफओआयएची विनंती नाकारली आहे. नौदलाने अधिक व्हिडिओ रिलीझ करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. नौदलाच्या एफओआयए कार्यालयाचे उपसंचालक ग्रेगरी कॅसन यांनी सांगितले की, ज्या व्हिडीओ रिलीझ करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यात वर्गीकृत डेटा आहे, जो आम्ही सार्वजनिक करू शकत नाही. ही माहिती समोर आल्याने देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या व्हिडिओंचा कोणताही भाग सार्वजनिक करता येणार नाही. जे तीन व्हिडीओ जारी केले गेले त्यातील काही भाग लीक झाला होता, प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचला होता. यामुळे नागरिक आवाज उठवत होते. 

तिन्ही व्हिडिओ रिलीझ झाल्यानंतर प्रथमच, UFO दिसण्यावरून चर्चा करण्यासाठी एक ओपन हाऊस उपसमिती स्थापन करण्यात आली. गेल्या वर्षी, राष्ट्रीय गुप्तचर संचालकांच्या कार्यालयातून UFOs दिसण्याबाबत काही प्रकाशन जारी करण्यात आले होते. ही माहिती अमेरिकी सरकार लपवून ठेवते. 

टॅग्स :Americaअमेरिका