शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांची प्रकृती गंभीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:54 IST

वृत्ताला दुजोरा नाही; शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडली?

सेऊल : उत्तर कोरियाचे राष्ट्र संस्थापक दिवंगत किम-द्वितीय संग यांच्या जयंतीदिनी आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला हजर न राहिल्याने उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांच्या प्रकृतीविषयी उलट-सुलट चर्चा आहे. त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर किम जोंग ऊन यांची प्रकृती गंभीर असल्याच्या वृत्ताला दुजोरा न देता मंगळवारी दक्षिण कोरिया सरकारने सांगितले की, उत्तर कोरियात मात्र कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्या नाहीत. किम यांच्या प्रकृतीसंबंधीच्या अफवांबाबत कोणतीही माहिती नसल्याचेही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले आहे.दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय प्रासादाचे (ब्ल्यू हाऊस) प्रवक्ते कांग मिन सोक यांनी निवेदन जारी करून म्हटले आहे की, काही प्रसार माध्यमांनी किम जोंग ऊन यांच्या प्रकृतीबाबत दिलेल्या वृत्ताला दुजोरा देणारी माहिती आमच्याकडे नाही. तथापि, या वृत्तानंतर उत्तर कोरियात मात्र कोणत्याही संशयास्पद वा असामान्य घडामोडी आढळल्या नाहीत.अमेरिकेच्या अधिकाऱ्यानेही किम जोंग ऊन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे किंवा त्यांची प्रकृती बिघडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. व्हाईट हाऊस आणि विदेश विभागानेही त्या वृत्ताबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सीएनएनने अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याचे किम जोंग ऊन यांची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर गंभीर असल्याचे वृत्त दिले होते. दोन्ही कोरिया देशांच्या एकीकरण मंत्रालयानेही ऑनलाईन दैनिक एनकेच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यांची प्रकृती गंभीर नाही, असेही गुप्तचर संस्थेने म्हटले आहे. एनकेच्या वृत्तात असे म्हटले आहे की, किम जोंग ऊन यांच्या हृदयावर प्याँगयांग येथे शस्त्रक्रिया झाली असून त्यांच्या प्रकृती सुधारत आहे.दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवेच्या एका अधिकाºयाने नाव उघड न करता सांगितले की, किम यांच्यावर शस्त्रक्रिया झाली की नाही, याला गुप्तचर संस्था दुजोरा देऊ शकत नाही.किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कोरानाविरुद्ध उपायावर चर्चा केली होती. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. प्रकृतीच्या कारणामुळे किम यांना नेतेपद सोडावे लागले, तरी उत्तर कोरियात फारशी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही. त्यांच्या बहीण किम यो जोंग यांचा सरकारमध्ये चांगलाच प्रभाव आहे. शिवाय किम परिवाराकडेच नेतृत्व ठेवण्याबाबत बहुतांश सदस्यांचे मत आहे.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया