शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ला देव म्हणत होता हा हैवान, स्वत:च्या मुलीसोबत केलं लग्न; एकूण 20 लग्ने केल्याचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:33 IST

एफबीआयनुसार 2019 मध्ये 50 लोकांच्या या छोट्या ग्रुपचं नियंत्रण आपल्या हाती घेतल्यानंतर सॅमुअलने स्वत:ला पैगंबर असल्याचं सांगण्यास सुरूवात केली आणि स्वत:च्या अल्पवयीन मुलीसोबत त्याने लग्न केलं.

अमेरिकेच्या एरिझोना प्रांतात स्वत:ला पैगंबर सांगणाऱ्या एका व्यक्तीने 20 महिलांसोबत लग्न केल्याचा खुलासा झाला आहे. त्याच्या या पत्नींपैकी एकीचं वय तर 9 वर्षे आहे. एफबीआयने खुलासा केला की, त्याच्या या 20 पत्नींमध्ये त्याच्या एका मुलीचाही समावेश आहे. या आरोपीचं नाव सॅमुअल रप्पीली बेटेमॅन आहे. सॅमुअल हा एकापेक्षा जास्त लग्न करणाऱ्या मोरमोन्स समूहाचा नेता आहे. 

एफबीआयनुसार 2019 मध्ये 50 लोकांच्या या छोट्या ग्रुपचं नियंत्रण आपल्या हाती घेतल्यानंतर सॅमुअलने स्वत:ला पैगंबर असल्याचं सांगण्यास सुरूवात केली आणि स्वत:च्या अल्पवयीन मुलीसोबत त्याने लग्न केलं. एजन्सीने सांगितलं की, सॅमुअलने कमीत कमी 20 महिलांसोबत लग्न केलं. ज्यातील जास्तीत जास्त तरूणीचं वय 15 पेक्षा कमी आहे. एफबीआयने याचाही खुलासा केला की, सॅमुअलने  त्याच्या तीन पुरूष शिष्यांना त्याच्या मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते.

हे कृत्य सॅमुअल बघत होता. या मुलींपैकी एकीचं वय केवळ 12 आहे. सॅमुअलने दावा केला की, या मुलींनी ईश्वरासाठी त्यांच्या पुण्याचा त्याग केला. ईश्वर त्यांचे शरीर पुन्हा ठीक करेल. या हैवानाबाबत सप्टेंबरमध्ये खुलासा झाला होता तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली. सॅमुअल अल्पवयीन मुलींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका ट्रेलरने पाठवत होता.

या ट्रेलरमध्ये बंद मुलींनी कशीतरी आपली बोटे बाहेर काढून इशारा केला आणि पोलिसांनी ते बघितलं. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. तेच सॅमुअलच्या गाडीमध्ये दोन महिला आणि दोन मुली आढळून आल्या. त्यासोबतच ट्रेलरमध्ये तीन मुली आढळून आल्या. या सगळ्यांची वयं  11 ते 14 दरम्यान आहेत. तेव्हाच सॅमुअलला अटक करण्यात आली. त्याला नंतर जामीन मिळाला तेव्हा तो पुरावे नष्ट करू लागला होता. मग त्याला पुन्हा अटक केली गेली. आता एफबीआय आरोपीच्या ठिकाणांवर छापे मारत आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी