शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

अमेरिकेचंही भारताच्या पावलावर पाऊल?; चीनला 'मोदी स्टाईल'मध्ये उत्तर देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 10:53 IST

चीनला आर्थिक झटका देण्यासाठी अमेरिकेची तयारी सुरू; लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

वॉशिंग्टन: लडाखमध्ये कुरघोड्या करून सीमेवरील तणाव वाढवणाऱ्या चीनला भारतानं सर्वच आघाड्यांवर चीतपट केलं. सामरिक, आर्थिक, कूटनीती अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भारतानं चीनला जोरदार धक्के दिले. त्याचा परिणाम काल दिसला. चीननं गलवान खोऱ्यातून आपलं सैन्य दोन किलोमीटर माघारी बोलावलं. चीनला आर्थिक झटका देण्यासाठी आता अमेरिकादेखील भारताच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. तसे संकेत परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी दिले आहेत. आम्ही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचं परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्येही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे लवकरच चीनला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. एकट्या भारतातल्या बंदीमुळे टिकटॉकला जवळपास ६ अब्ज डॉलर्सचं नुकसान होतं आहे. यामध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.लडाख सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चिनी अ‍ॅप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असल्याचं म्हणत भारत सरकारनं चिनी अ‍ॅपवर बंदी घातली. त्यामुळे चिनी कंपन्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. आम्ही भारतीय वापरकर्त्यांची माहिती चीन सरकारला देत नसल्याचं स्पष्टीकरण चिनी कंपन्यांनी दिलं आहे. चीन सरकारनं कधीही वापरकर्त्यांचा तपशील मागितला नसल्याचं टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर यांनी भारत सरकारला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.भारत सरकारनं काही दिवसांपूर्वीच टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र या अ‍ॅपवर चीनमध्ये खूप आधीपासूनच बंदी आहे. टिकटॉक अ‍ॅप बाईट डान्स या चिनी कंपनीच्या मालकीचं आहे. भारत सरकारनं बंदी घातल्यानंतर बाईट डान्स कंपनीनं चीन सरकारपासून अंतर राखलं आहे. भारतीय वापरकर्त्यांचा तपशील सिंगापूरमध्ये असलेल्या सर्व्हरमध्ये ठेवला जातो. चीन सरकारनं कधीही वापरकर्त्यांची माहिती मागितलेली नाही आणि सरकारनं अशी विनंती केल्यास आम्ही ती कधीही पूर्ण करणार नाही, असं स्पष्टीकरण वारंवार टिकटॉककडून देण्यात येत आहे.चीनच्या अडचणी वाढल्या; जिनपिंग सरकारविरोधात मुस्लिम थेट आंतरराष्ट्रीय कोर्टातदक्षिण चीन समुद्रात अमेरिकेने दाखवली लष्करी ताकद; चीनच्या धमकीची उडवली खिल्ली

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनAmericaअमेरिकाTik Tok Appटिक-टॉक