शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
2
महिला IAS अधिकाऱ्याचे भाड्याने घर, रात्रीचे चालायचे काळे धंदे; छाप्यात प्रत्येक खोलीत सापडल्या मुली
3
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
4
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
5
ST निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...; मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
6
"आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
7
एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
8
बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
9
Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
10
'५-डे वीक'साठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार! 'या' तारखांना तुमचे आर्थिक व्यवहार अडकणार?
11
‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
12
मुस्तफिजूर वाद पेटला! बांगलादेश भारताबाहेर खेळण्यासाठी अडून बसला; BCCI ला करोडोंचा फटका...
13
काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल
14
Makeup Viral Video: मेकअपनंतर तरुणीला ओळखणंही झालं कठीण; तरुण म्हणाले, 'हा तर विश्वासघात!'
15
असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ; पोलिसांना करावा लागला बळाचा वापर!
16
उमर खालिद, शरजिल इमामचा मुक्कम तुरुंगातच, सर्वोच्च न्यायालायने 'असं' कारण देत जामीन अर्ज फेटाळला
17
बांगलादेशने आता आयपीएलवर बंदी घातली; T20 साठी भारतात येण्यावरून आधीच नाराजी व्यक्त केली होती
18
६ जानेवारीला अंगारक संकष्ट चतुर्थी: राहु काळ कधी? गणेश पूजन विधी, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ
19
Diet Tips: जिमला न जाताही 'त्या' स्लिम कशा? सडपातळ मुलींच्या १२ सवयी तुम्हीही फॉलो करा 
20
'बाळासाहेबांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्यासोबत, विचारांचा वारसा महायुतीकडे’; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Daily Top 2Weekly Top 5

व्हेनेझुएलात युद्धाचा भडका; अमेरिकेने राष्ट्राध्यक्षांना पत्नीसह घेतले ताब्यात,ख्रिसमसलाच होणार होती कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:02 IST

राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

US Strikes Venezuela: जगभरातील राजकारणाला हादरवून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलामध्ये यशस्वी लष्करी कारवाई करून तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोर्स यांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी पहाटे व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांनंतर हा नाट्यमय घटनाक्रम समोर आला.

मादुरो दाम्पत्याला देशाबाहेर नेले; ट्रम्प यांचा दावा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, "अमेरिकेने निकोलस मादुरो आणि त्यांच्या प्रशासनाविरुद्ध मोठी लष्करी कारवाई यशस्वी केली आहे. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडण्यात आले असून त्यांना व्हेनेझुएलाच्या बाहेर सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे." ही कारवाई अमेरिकन लष्कर आणि कायदा अंमलबजावणी संस्थांच्या  संयुक्त मोहिमेतून पार पडली. यासंदर्भात लवकरच एक मोठी पत्रकार परिषद घेऊन तपशील जाहीर केला जाणार आहे.

कराकसमध्ये भीषण बॉम्बवर्षाव

कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन हवाई दलाने व्हेनेझुएलातील अनेक महत्त्वाच्या लष्करी आणि सरकारी ठिकाणांना उद्ध्वस्त केले आहे. यामध्ये लष्करी मुख्यालय, हवाई तळ, मुख्य रडार स्टेशन, व्हेनेझुएलाचे प्रमुख बंदर, मिरांडा विमानतळ यांचा समावेश आहे. ऑपरेशन 'ख्रिसमस' आणि खराब हवामानाचा अडथळा

सीबीएस न्यूजच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी या हल्ल्याला ख्रिसमसच्या आधीच ग्रीन सिग्नल दिला होता. मूळ योजनेनुसार ही कारवाई ख्रिसमसच्या दिवशीच होणार होती, मात्र त्याच वेळी नायजेरियातील आयएसआयएस विरुद्धच्या मोहिमेला प्राधान्य द्यावे लागल्याने ही कारवाई लांबणीवर पडली. त्यानंतर खराब हवामानामुळे काही दिवस वाट पाहावी लागली आणि अखेर शनिवारी पहाटे हा हल्ला करण्यात आला.

नाकेबंदी आणि हवाई निर्बंध

हल्ला होण्यापूर्वीच अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने व्हेनेझुएलाच्या हवाई क्षेत्रात कमर्शियल विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली होती. यावरून अमेरिकेने या हल्ल्याची तयारी अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली होती, हे स्पष्ट होते.

मादुरो यांचे तेल साठ्यावरून केलेले आरोप

काही दिवसांपूर्वीच निकोलस मादुरो यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, अमेरिका व्हेनेझुएलातील सरकार बदलून तेथील अफाट तेल साठ्यावर ताबा मिळवू पाहत आहे. ऑगस्ट २०२५ पासून कॅरिबियन समुद्रात अमेरिकन नौदलाची वाढलेली हालचाल हे या मोठ्या हल्ल्याचे संकेत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळव्हेनेझुएला सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून याला नागरी आणि लष्करी प्रतिष्ठानांवर झालेला भ्याड हल्ला म्हटले आहे. मात्र, राष्ट्राध्यक्षच अमेरिकेच्या ताब्यात गेल्याच्या दाव्यामुळे व्हेनेझुएलातील सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Allegedly Detains Venezuelan President Maduro; Military Action Claimed

Web Summary : US forces allegedly captured Venezuelan President Maduro and his wife after bombings in Caracas. Trump claims they're safely out of Venezuela following a joint military operation. Airstrikes targeted Venezuelan military and government sites. The operation, planned for Christmas, was delayed due to weather and another mission.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका