शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इराण अन् अमेरिकेत कोण करतंय मध्यस्थी?; भारताच्या कट्टर शत्रू देशासह ३ मुस्लीम राष्ट्र सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 22:13 IST

तुर्कस्तान, इजिप्त आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी व्हाईट हाऊसचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांची तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची स्वतंत्रपणे भेट घेतली

वॉशिंग्टन - अमेरिका आणि इराण युद्धात चर्चेतून मार्ग काढण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या पॉवर प्लांट आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले ५ दिवसांसाठी रोखण्याची घोषणा केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात मागील २ दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांच्या या विधानानंतर इराणने युद्धविरामसाठी तयार नसल्याचं सांगितले. त्यातच आता ३ इस्लामिक देश अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा खुलासा झाला आहे. त्यात भारताचा शत्रू पाकिस्तानचाही समावेश आहे.

तुर्कस्तान, इजिप्त आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी व्हाईट हाऊसचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांची तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची स्वतंत्रपणे भेट घेतली  असं अमेरिकन वृत्तसंस्था ॲक्सिऑसने वृत्त दिले आहे. ही चर्चा युद्ध संपवण्यापासून वादग्रस्त मुद्दे सोडवण्यासाठी होती असं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. अराघची यांच्या मंत्रालयानेही तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहे असं सांगितले. मात्र इराणच्या मेहर समाचार एजन्सीकडून सांगण्यात येतंय की, अमेरिकेने थेट चर्चेत सहभागी व्हावे अशी इराणची इच्छा आहे. परंतु तुर्की, पाकिस्तान आणि इजिप्तच्या प्रतिनिधींची बैठक कुठे झाली, त्यात कोण सहभागी होते याबाबत उत्तर देण्यास व्हाईट हाऊसने नकार दिला. 

इराणच्या पलटवारनंतर ट्रम्प बॅकफूटवर?

ट्रम्प यांनी सातत्याने इराणचे नेतृत्व, क्षेपणास्त्र क्षमता आणि आण्विक पायाभूत सुविधा नष्ट करण्याची मागणी केली आहे. परंतु हा संघर्ष लांबत चालल्याने ते बचावात्मक पवित्र्यात आले आहेत. आखाती प्रदेशात अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवरील हल्ले तीव्र झाले आहेत आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील बहुतांश सागरी वाहतूक विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे जागतिक ऊर्जा संकट अधिकच गंभीर झाले आहे. अमेरिकेतील आगामी मध्यावधी निवडणुकांमुळेही दबाव वाढला आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ट्रम्प आता या संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असल्याचे दिसत आहे. त्यांनी अलीकडेच म्हटले आहे की ते  मध्यपूर्वेतील आमचे मोठे लष्करी प्रयत्न हळूहळू कमी करण्याची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी इराणमधील सत्तापालटाची अट वगळली जी पूर्वी त्यांच्या भूमिकेचा एक महत्त्वाचा भाग होती.

इस्रायल इराणसोबतच्या शांतता कराराला पाठिंबा देईल का?

ट्रम्प यांच्या कोणत्याही शांतता प्रयत्नांना इस्रायल पाठिंबा देईल असे संकेत अद्याप दिलेले नाहीत. युद्ध अजूनही मधल्या टप्प्यात आहे परंतु आमची दिशा स्पष्ट आहे आणि आम्ही भविष्यासाठी व स्वातंत्र्यासाठी लढत राहू असं इस्रायलचे लष्करप्रमुख आयल झमीर यांनी म्हटलं. एका गंभीर घडामोडीत इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलची प्रसिद्ध 'आयर्न डोम' संरक्षण प्रणाली भेदली असून अणुभट्ट्या असलेल्या दिमोनासारख्या संवेदनशील भागांना लक्ष्य केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran-US tensions: Turkey, Egypt, Pakistan mediate; Israel hit by missiles.

Web Summary : Turkey, Egypt, and Pakistan are mediating between Iran and the US to de-escalate tensions. Iran wants direct talks. Israel faces missile strikes, raising regional conflict fears.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाIranइराणPakistanपाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प