शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासांत इराणचे ४ मोठे हल्ले, इस्रायली पंतप्रधानांचं जगाला आवाहन; "आता वेळ आलीय, सर्वांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 19:43 IST

इराणने सुमारे ४,००० किमी अंतरावर असलेल्या दिएगो गार्सिया येथील अमेरिका-ब्रिटनच्या लष्करी तळालाही लक्ष्य केले होते.

तेल अवीव -  इराणकडूनइस्रायलवर रविवारी मोठे हल्ले करण्यात आले. त्यात डिमोना आणि अरद शहरावर झालेल्या मिसाईल हल्ल्याची पंतप्रधान नेतन्याहू यांनी पाहणी केली. मागील ४८ तासांत जे घडलंय, त्यामुळे जगासाठी इराण सर्वात मोठा धोका बनला आहे. इराणने सर्वसामान्य लोकांना टार्गेट केले. या परिसरात वृद्ध, लहान मुलांचे डे केअर सेंटरही आहेत. तरीही इराणने इथे मिसाईल डागली. इराण या युद्धात क्लस्टरसारख्या निर्बंध घातलेल्या बॉम्बचाही वापर करत आहे जे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे असा आक्षेप नेतन्याहू यांनी घेतला आहे.

नेतन्याहू यांनी जगातील नेत्यांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आता वेळ आलीय या लढाईत जगातील इतर देशांनी उघडपणे सहभागी व्हावे. अमेरिका, इस्रायल केवळ स्वत:साठी नव्हे तर जगासाठी ही लढाई लढत आहेत. इतर देश कधीपर्यंत वाट पाहणार आहेत. आता कारवाई करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून हा वाढणारा धोका रोखला जाऊ शकतो असं त्यांनी जगातील देशांना संबोधित करताना म्हटलं आहे.

तसेच इराणने यरुशलम येथील पवित्र धार्मिक स्थळाला टार्गेट केले आहे. बॅलेस्टिक मिसाइल अशाठिकाणी पडली, जिथे चर्च ऑफ द होली सेपल्चर, अल अक्सा मशिद आणि वेस्टर्न वॉलसारखी अनेक धार्मिक स्थळांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. ही तिन्ही ठिकाणी जगातील मोठी धार्मिक स्थळे आहेत. परंतु इराणला त्याचीही पर्वा नाही असा आरोप नेतन्याहू यांनी केला आहे. इस्रायली हवाई दल आणि होम फ्रंट कमांड डिमोना येथील प्राथमिक हल्ल्याची चौकशी करत आहेत. डिमोना हे बेअरशेबाच्या दक्षिण पूर्वेला सुमारे ३० किमी अंतरावर एक शहर आहे. हे शहर शिमोन पेरेस नेगेव न्यूक्लियर रिसर्च सेंटरजवळ आहे, जे इस्रायलच्या सीक्रेट अणुकार्यक्रमाचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.

इराण तेलासाठी ब्लॅकमेल करतंय

दरम्यान, इराणने सुमारे ४,००० किमी अंतरावर असलेल्या दिएगो गार्सिया येथील अमेरिका-ब्रिटनच्या लष्करी तळालाही लक्ष्य केले होते. इराणची क्षेपणास्त्रे आता युरोपपर्यंत पोहोचू शकतात, ज्यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली असून त्यामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इराण तेलासाठी जगाला ब्लॅकमेल करत आहे असाही नेतान्याहू यांनी आणखी एक गंभीर आरोप केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Netanyahu Urges World Action After Iran's Alleged Attacks in Israel

Web Summary : Netanyahu calls for global action after Iran's missile attacks on Israel, citing threats to civilians, religious sites, and global oil supplies. He accuses Iran of violating international law and blackmailing the world, urging immediate intervention to prevent further escalation.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर