US Israel Iran War : मागील काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान, आता इराणच्या नतान्झ अणुउर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे, या हल्ल्यामुळे रेडिएशनचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. किरणोत्सर्गाची कोणतीही गळती झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे. नतान्झ हे इराणचे मुख्य युरेनियम संवर्धन केंद्र असून, ते तेहरानच्या आग्नेयेला सुमारे २२० किलोमीटर अंतरावर आहे. यापूर्वीही या सुविधेला अनेक वेळा लक्ष्य करण्यात आले आहे. हा नवीन हल्ला अमेरिका-इस्रायल आघाडीने राबवलेल्या हवाई मोहिमेचा एक भाग असल्याचे मानले जात आहे. इराणने याला एक क्रूर हल्ला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे.
मार्च २०२६ मध्ये, ज्यावेळी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा हवाई हल्ला केला, तेव्हा हा हल्ला झाला. इराणचे अणुऊर्जा प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा नियामक संस्था, IAEA ला पत्र लिहून, नतान्झवर दोन क्रूर हल्ले झाल्याचा आरोप केला. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमधून असे दिसून आले की, प्रवेशद्वार आणि काही इमारतींचे नुकसान झाले होते, तर तीन इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या. 'नतान्झच्या काही भागांचे नुकसान झाले आहे, परंतु मुख्य भूमिगत संवर्धन हॉलवर लक्षणीय परिणाम झालेला नाही आणि कोणताही किरणोत्सर्गी धोका नाही, असे IAEA ने पुष्टी केली आहे.
वीज पुरवठा प्रणालीचे मोठे नुकसान
हा ताजा हल्ला जून २०२५ मधील १२ दिवसांच्या इराण-इस्रायल युद्धाची आठवण करून देतो, यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेने नतान्झसह इराणच्या प्रमुख अणु ठिकाणांना लक्ष्य केले होते. प्रायोगिक इंधन संवर्धन प्रकल्प नष्ट झाला. वीज पुरवठा प्रणालीचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी इराणने दावा केला होता की, त्यांचा अणु कार्यक्रम शांततापूर्ण आहे, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाने यावर दीर्घकाळापासून संशय व्यक्त केला आहे. ताज्या हल्ल्यापूर्वीही, IAEA ने नतान्झ येथील हालचालींवर लक्ष ठेवले होते, परंतु त्यांचे स्वरूप अस्पष्ट होते.
Web Summary : Iran's Natanz nuclear facility was attacked, raising radiation fears. The US-Israel alliance is suspected. Earlier attacks damaged the facility in March 2026 and June 2025. IAEA confirms some damage but no radiation leak. Power supply systems suffered significant losses.
Web Summary : ईरान के नतान्ज़ परमाणु ऊर्जा केंद्र पर हमला हुआ, जिससे विकिरण का खतरा बढ़ गया है। अमेरिका-इजरायल गठबंधन पर संदेह है। पहले के हमलों में मार्च 2026 और जून 2025 में सुविधा को नुकसान हुआ था। IAEA ने कुछ नुकसान की पुष्टि की लेकिन कोई विकिरण रिसाव नहीं। बिजली आपूर्ति प्रणाली को भारी नुकसान हुआ।