शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्यपूर्वेतील युद्धात भारत निभावू शकतो मोठी भूमिका; भारताच्या कूटनीतीचे इराणकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:48 IST

US-Israel-Iran War: अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे.

US-Israel-Iran War: अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. इतके दिवस होऊनही युद्धविराम किंवा होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्किए हे देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजून अंतिम करारावर सहमती झालेली नाही. अशातच, इराणने भारताच्या कूटनीतीचे कौतुक केले आणि भारत मोठी भूमिका बजावू शकतो असे म्हटले आहे.

भारताच्या कूटनीतीचे इराणकडून कौतुक

इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करत म्हटले की, भारतीय कूटनीती अत्यंत संतुलित आणि प्रभावी आहे. या संघर्षात भारत मोठी भूमिका निभावू शकतो. हे कौतुक अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराणला अंतिम मुदत दिल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनीदेखील भारताच्या संतुलित परराष्ट्र धोरणामुळे तणाव कमी करण्यासाठी भारत प्रभावी भूमिका बजावू शकतो, असे म्हटले होते.

इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा भारताशी संपर्क

इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी फोनवर चर्चा केली. इराणने आरोप केला की, अमेरिका आणि इस्त्रायल औद्योगिक प्रकल्प, रुग्णालये, शाळा, निवासी भाग आणि अणु केंद्रांवर हल्ले करत आहेत. इराणने स्पष्ट केले की, इराणची जनता आणि सेना देशाच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे तयार आहे. या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगाच्या स्थिरतेवर होऊ शकतो.

होर्मुझ सामुद्रधुनी बंद, जगभरात तेल दरवाढ...

फारसची खाडी आणि ओमानची खाडी यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी. इराणने हा मार्ग बंद केल्यामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. इराणने सांगितले आहे की, त्यांच्या मित्र देशांची जहाजे जाऊ शकतात, पण अमेरिका, इस्त्रायल आणि त्यांच्या सहयोगी देशांची जहाजे जातील. यामुळे जगभरात तेल आणि गॅसच्या किमती वाढल्या आहेत.

भारतावर काय परिणाम होऊ शकतो?

पश्चिम आशिया हा भारतासाठी तेल आणि गॅसचा प्रमुख स्रोत आहे. जर होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिली तर, भारतातील पेट्रोल-डिझेल दर वाढू शकतात, खत (फर्टिलायझर) पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, महागाई वाढू शकते आणि ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून भारताने या संघर्षात युद्धविराम आणि होर्मुझ मार्ग खुला ठेवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Praises India's Diplomacy Amidst Middle East Conflict, Sees Key Role.

Web Summary : Iran lauded India's balanced diplomacy in the US-Israel-Iran conflict, suggesting a significant role for India. The closure of the Strait of Hormuz threatens global oil supplies, potentially impacting India's economy and energy security, prompting diplomatic efforts for resolution.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेईrussiaरशिया