शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधी 3, आणि आता 6; युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेपुढे ठेवल्या ६ अटी, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:31 IST

US-Israel-Iran Crisis: तात्काळ युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत...

US-Israel-Iran Crisis: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाl तात्काळ युद्धविराम होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर इराणने युद्ध संपवण्यासाठी सहा अटी जाहीर केल्या असून, या अटी फक्त युद्धविरामापुरत्या मर्यादित नसून संपूर्ण मध्यपूर्वेतील राजकीय-लष्करी समीकरण बदलण्याचा संकेत देतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लेबनानी माध्यम अल मायादीनला दिलेल्या मुलाखतीत या अटी जाहीर केल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही प्रतिक्रिया नसून अनेक महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रणनीतीचा भाग आहे.

होर्मुज सामुद्रधुनीवरून तणाव वाढला

युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली करण्यासाठी 48 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी इशारा दिला की, जर सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणच्या वीज वितरण यंत्रणेवर हल्ले केले जातील. याला प्रत्युत्तर देताना इराणने धमकी दिली की, होर्मुज सामुद्रधुनीवर अमेरिकेने काही कारवाई केली, तर आम्ही गल्फ देशांच्या वीज वितरण यंत्रणेवर आणि अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करू. यामुळेच आता हा तणाव कमी होण्याऐवजी आणखी वाढताना दिसतोय. 

युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या 6 अटी

  1. युद्ध पुन्हा होणार नाही याची हमी, तात्पुरता किंवा प्रतीकात्मक युद्धविराम मान्य नाही.
  2. अमेरिकेचे सर्व लष्करी तळ मध्यपूर्वेतून हटवणे आणि पश्चिम आशियातील अमेरिकेची लष्करी उपस्थिती कमी करणे.
  3. युद्धामुळे झालेल्या सर्व नुकसानीसाठी आर्थिक भरपाई.
  4. सर्व प्रादेशिक युद्धांचा शेवट.
  5. होर्मुज सामुद्रधुनीसाठी नवीन कायदेशीर व्यवस्था  आणि जागतिक ऊर्जा मार्गावर इराणचा प्रभाव सुनिश्चित करणे.
  6. इराणविरोधी प्रचार करणाऱ्या माध्यमांतील संबंधित व्यक्तींवर कारवाई व प्रत्यर्पण.

विश्लेषकांच्या मते, या अटींवरून इराण आता युद्धविरामासाठी नव्हे, तर स्वतःच्या अटींवर नवा प्रादेशिक करार करण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे.

इराणची आधीपासून आखलेली रणनीती

इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, इराणने सुरुवातीच्या मोठ्या प्रमाणातील क्षेपणास्त्र हल्ल्यांऐवजी आता अचूक लक्ष्यांवर हल्ले करण्याची रणनीती अवलंबली आहे. शत्रूची हवाई संरक्षण व्यवस्था नष्ट करण्यात आली आहे. काही भागात आकाशावर नियंत्रण मिळवले असल्याचा दावा इराणने केला आहे. इराणचे म्हणणे आहे की, पूर्ण युद्धविरामाची हमी मिळेपर्यंत हल्ले थांबणार नाहीत.

तात्काळ युद्धविरामाची शक्यता कमी

इराणी अधिकाऱ्यांच्या मते, सध्याच्या लष्करी परिस्थितीचा विचार करता तत्काळ युद्धविराम होण्याची शक्यता फार कमी आहे. तेहरानची सध्याची रणनीती म्हणजे हल्लेखोरांना शिक्षा देणे आणि इस्त्रायल-अमेरिकेला धडा शिकवणे, अशी भूमिका त्यांनी मांडली. इराणने स्पष्ट संदेश दिला की, भविष्यातील कोणताही युद्धविराम हा जुन्या परिस्थितीकडे परत जाणार नाही, तर युद्धातील परिस्थितीनुसार मध्यपूर्वेतील नवीन राजकीय-लष्करी समीकरण तयार होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Sets Six Conditions for US to End Middle East War

Web Summary : To end the conflict, Iran demands US troop withdrawal, compensation for damages, regional war cessation, control over Hormuz Strait, and action against anti-Iran media. This signals a shift towards a new regional order on Iran's terms, not just a ceasefire, after heightened tensions.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू