US Iran War: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांवर गंभीर आरोप झाले आहेत. युद्धाच्या परिस्थितीत खाडी देशांना ड्रोन तंत्रज्ञान विकून ट्रम्प यांचे पुत्र एरिक ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर मोठा आर्थिक फायदा कमावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ड्रोन स्टार्टअपचा व्यवसाय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एरिक ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांची एक ड्रोन स्टार्टअप कंपनी इराणच्या हल्ल्यांचा सामना करणाऱ्या खाडी देशांना आपली ड्रोन तंत्रज्ञान प्रणाली विकत आहे. फ्लोरिडास्थित ‘पॉवरस’ या कंपनीने ट्रम्प बंधूंना आपल्या कंपनीशी जोडले असून, युद्ध परिस्थितीमुळे या तंत्रज्ञानाची मागणी वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
माजी अधिकारी रिचर्ड पेंटर यांचे आरोप
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात काम केलेले माजी अधिकारी रिचर्ड पेंटर यांनी असोसिएटेड प्रेसला दिलेल्या माहितीत हा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, खाडी देशांवर राष्ट्राध्यक्षांच्या मुलांकडून उपकरणे खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची शक्यता आहे.
पेंटर यांनी टीका करताना म्हटले की, एखाद्या राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्यांनी युद्धातून पैसा कमावण्याची ही पहिलीच घटना असू शकते. तसेच त्यांनी असेही म्हटले की, हे असे युद्ध आहे, ज्यासाठी काँग्रेसची औपचारिक मंजुरीही घेण्यात आलेली नाही.
कंपनीकडून स्पष्टीकरण
पॉवरस कंपनीचे सहसंस्थापक ब्रेट वेलिकोविच यांनी सांगितले की, कंपनी सध्या अनेक खाडी देशांमध्ये ड्रोन इंटरसेप्टर सिस्टमचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. ही प्रणाली इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना रोखण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आमच्याकडे अशी तंत्रज्ञान प्रणाली आहे, जी लोकांचे जीव वाचवू शकते. सध्या आम्ही मध्यपूर्वेत अनेक प्रात्यक्षिके करत आहोत. तसेच जगात शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू असून अमेरिका मागे राहू नये, म्हणून उत्पादन वाढवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.
ट्रम्प यांच्या मुलांना इक्विटी मिळण्याची शक्यता
अहवालानुसार, या ड्रोन कंपनीसोबत झालेल्या करारामुळे ट्रम्प बंधूंना कंपनीमध्ये मोठा इक्विटी हिस्सा मिळू शकतो. त्यामुळे युद्ध परिस्थितीत या व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना एरिक ट्रम्प यांनी सांगितले की, मला ज्या कंपन्यांवर विश्वास आहे, त्यामध्ये गुंतवणूक केल्याचा अभिमान आहे. ड्रोन हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे.
Web Summary : Trump's sons face accusations of profiting from US-Iran tensions. They allegedly sold drone technology to Gulf states, benefitting from war fears through their drone startup.
Web Summary : ट्रंप के बेटों पर ईरान-अमेरिका तनाव से मुनाफा कमाने का आरोप है। खाड़ी देशों को ड्रोन तकनीक बेचकर युद्ध के डर का फायदा उठाया, ड्रोन स्टार्टअप से लाभ प्राप्त किया।