US-Iran peace talks: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये युद्ध थांबवण्याच्या दिशेने चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी (११ एप्रिल) दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये पहिली बैठक झाली. चार तास चाललेल्या या बैठकीत चर्चा होर्मुझ सामुद्रधुनीवरच अडकली. इराण, अमेरिका आणि पाकिस्तान असे तिन्ही देश या बैठकीत सामील झाले होते. पण, होर्मुझ मुद्द्यावर एकमत होऊ शकले नाही, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.
इराणच्या सरकारी माध्यम संस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दा दोन्ही देशांसाठी कळीचा बनला आहे. दोन्ही देशांचे यावर मतभेद होत असून, आतापर्यंत एकमत होऊ शकले नाही.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली जारेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ पाकिस्तानात आले आहे. तर परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांच्या इराणचे शिष्टमंडळ आलेले आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तानची मध्यस्थी
पहिल्या टप्प्यातील चर्चेत पाकिस्तानी उच्चाधिकारी सामील झाले होते. इराण आणि अमेरिका यांनी आपापले मुद्दे पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मार्फत मांडले, असे बीबीसीने सूत्रांच्या हवाल्याने आपल्या वृत्ता म्हटले आहे. वेगवेगळे मुद्दे दोन्ही देशांनी एकमेकांसमोर मांडले.
चर्चेची दुसरी फेरी सुरू
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बीबीसीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी सुरू झाली आहे. दोन्ही देशांनी ज्या मागण्या समोर ठेवल्या आहेत, त्या मुद्द्यांच्या तांत्रिक बाजूंवर चर्चा केली जाणार आहे. व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इस्लामाबादमध्ये होत असलेली चर्चा त्रिस्तरीय आहे.
कोणत्या मुद्द्यांवर भर?
शांतता चर्चेत पश्चिम आशियात लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी आणखी मजबूत करणे म्हणजे युद्ध थांबवणे, लेबनानमध्ये होत असलेले हल्ले थांबवणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल-गॅस जहाजांची वाहतूक सुरक्षितपणे होईल याची दक्षता घेणे, या मुद्द्यावर भर दिला गेला आहे.
इराणच्या संपत्तीवरील बंदी उठवणार?
इराणी सूत्रांनी सांगितले की, इराणच्या ज्या मालमत्ता गोठवण्यात आलेल्या आहेत, त्यावरील बंदी हटवण्यात येईल, अशी हमी अमेरिकेने दिली आहे. म्हणजे इराण त्या मालमत्ता आणि पैसा परत मिळतील. पण, अमेरिककडून अद्याप याबद्दल कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
Web Summary : US-Iran peace talks in Islamabad hit a snag over the Hormuz Strait. The meeting, also involving Pakistan, failed to yield consensus on the crucial waterway. Discussions focused on ceasefire enforcement, Lebanon, and safe oil/gas transport.
Web Summary : इस्लामाबाद में अमेरिका-ईरान शांति वार्ता होर्मुज जलडमरूमध्य पर अटकी। पाकिस्तान भी शामिल, बैठक में जलमार्ग पर सहमति नहीं बन पाई। युद्धविराम लागू करने, लेबनान और सुरक्षित तेल/गैस परिवहन पर चर्चा हुई।