शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:44 IST

महत्वाचे म्हणजे, चर्चा फिस्कटल्यानंतर व्हॅन्स इराणला कोणतीही पूर्वसूचना न देताच तडकाफडकी वॉशिंग्टनला रवाना झाले. यानंतर, आता पाकिस्तानने दोन्ही देशांकडे एक नवी मागणी केली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानात झालेली शांतता चर्चा अखेर काही मुद्द्यांवरून फिस्कटली. यासाठी इराणने अमेरिकेलाच जबाबदार धरले. अमेरिकेच्या मागण्या अवास्तव होत्या असे म्हणत, चर्चा निष्फळ ठरल्याचे खापर इराणने अमेरिकेवरच फोडले. तर यासंदर्भात घोषणा करताना अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी  इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला, असे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, चर्चा फिस्कटल्यानंतर व्हॅन्स इराणला कोणतीही पूर्वसूचना न देताच तडकाफडकी वॉशिंग्टनला रवाना झाले. यानंतर, आता पाकिस्तानने दोन्ही देशांकडे एक नवी मागणी केली आहे.

पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी -पाकिस्तानी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांनी १४ दिवसांच्या युद्धविरामाची (सीझफायर) मुदत वाढवावी, अशी विनंती पाकिस्तानने केली आहे. आता पाकिस्तानच्या या मागणीला इराण आणि अमेरिका कसा प्रतिसाद देतात? पाकिस्तानची ही मागणी हे दोन्ही देश स्वीकारतात की नाही? हे बघावे लागेल. दोन्ही देशांमध्ये सध्या 14 दिवसांच्या युद्धविरामावर सहमती झाली आहे.

अमेरिकेच्या प्रमुख मागण्या -माध्यमांतील वृत्तानुसार, अमेरिकेने इराणला युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याची मागणी केली आहे. यात देशातील सुमारे ९०० पाउंड युरेनियमचा साठा देशाबाहेर पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिवाय, अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीचे व्यवस्थापन स्वतःच्या अटींवर करायचे आहे. अशा अटींमुळे ही चर्चा फिस्कटल्याचे समजते.

महत्वाचे म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाचा मोठा फटका पाकिस्तानच्या प्रतिमेला बसला आहे. या प्रक्रियेचे नेतृत्व करणारे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आवडते 'फील्ड मार्शल' मानले जातात. त्यांच्या नेतृत्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : US-Iran talks fail; US demands and Pakistan's new request.

Web Summary : US-Iran talks in Pakistan collapsed over US demands. Pakistan urges a ceasefire extension. US wanted Iran to halt uranium enrichment and control the Strait of Hormuz. The failure impacts Pakistan's image.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाIranइराणWarयुद्ध