"संपूर्ण संस्कृती मिटवून टाकू," अशी भीषण धमकी देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या २४ तासांत आपल्या भूमिकेत मोठा बदल केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांचा 'सीझफायर' (युद्धविराम) जाहीर झाल्यानंतर, ट्रम्प यांनी आता इराणच्या पुनर्निर्माणासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मिडल ईस्टमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या महायुद्धाच्या सावटाखालील जगाला मोठा दिलासा मिळाला आहे.
अवघ्या एक दिवसापूर्वी ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची मुदत देत "अस्तित्व संपवण्याची" भाषा केली होती. मात्र, चीनच्या मध्यस्थीनंतर इराणने '१० कलमी' शांतता प्रस्ताव मान्य केला आणि परिस्थिती निवळली. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, "इराणला आता शांतता हवी आहे आणि अमेरिका त्यांच्या पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत पूर्ण मदत करेल. आम्ही सर्व प्रकारचा पुरवठा इराणला पाठवू, जेणेकरून तिथले जनजीवन पुन्हा रुळावर येईल."
होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणारसीझफायरच्या अटीनुसार इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' हा महत्त्वाचा सागरी मार्ग दोन आठवड्यांसाठी खुला करण्याचे मान्य केले आहे. यामुळे जागतिक तेल पुरवठा सुरळीत होणार असून तेलाच्या किमतीतही घट होण्याची शक्यता आहे. "हा जागतिक शांततेसाठी मोठा दिवस आहे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी या घडामोडींचे स्वागत केले आहे. परंतू १५ दिवसांनी काय होईल, यावर मात्र धास्ती कायम आहे.
पुनर्निर्माणासाठी निधी कुठून येणार?एका रिपोर्टनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून इराण आणि ओमान 'ट्रान्झिट फी' आकारू शकतात. या पैशांचा वापर युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई आणि इराणच्या पुनर्निर्माणासाठी केला जाण्याची शक्यता आहे. या तहामुळे इराणमधील लोकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून त्यांनी रस्त्यावर उतरून आनंद साजरा केला आहे.
Web Summary : After a ceasefire, Trump pledged US aid for Iran's reconstruction. Iran agreed to open the Strait of Hormuz, easing global oil supply concerns. The deal, brokered after tensions, brings relief but future uncertainty remains. Transit fees may fund rebuilding.
Web Summary : युद्धविराम के बाद, ट्रम्प ने ईरान के पुनर्निर्माण के लिए अमेरिकी सहायता का वादा किया। ईरान होर्मुज जलडमरूमध्य खोलने पर सहमत हुआ, जिससे वैश्विक तेल आपूर्ति की चिंता कम हुई। तनाव के बाद हुआ यह सौदा राहत लाता है, लेकिन भविष्य अनिश्चित है। पारगमन शुल्क से पुनर्निर्माण के लिए धन मिल सकता है।