शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय CEO म्हणाले- 12 तास काम करावे लागेल; आता मिळाल्या जिवे मारण्याच्या धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:37 IST

CEO Daksh Gupta Death Threats: अमेरिकेतील Ai कंपनीचे प्रमुख दक्ष गुप्ता यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

CEO Daksh Gupta Death Threats:  काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी दिवसातून 10-12 तास काम करण्याचे वक्तव्य केल्याने मोठा वाद झाला होता. आता अशाच प्रकारचे विधान केल्यामुळे अमेरिकेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअपच्या भारतीय CEO ला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथील ग्रेप्टाइल कंपनीचे प्रमुख दक्ष गुप्ता यांना या धमक्या मिळाल्या आहेत.

अमेरिकन एआय स्टार्टअप ग्रेप्टाइलचे सीईओ दक्ष गुप्ता यांनी दावा होता की, सोशल मीडियाद्वारे त्यांच्या कंपनीची कार्यपद्धती सांगितल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळाल्या आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये कंपनीत आठवड्यातून 84 तास काम आणि वर्क-लाइफ बॅलन्स नसल्यावर भाष्य केले होते. यामुळे ते चर्चेत आले, पण आता यामुळेच धमक्या मिळत आहेत. 

पोस्ट व्हायरल सीईओ दक्ष गुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'ग्रेप्टाइलमध्ये आठवडा 84 तासांचा असतो आणि इथे घड्याळ रात्री उशिरापर्यंत चालते. वीकेंडलाही कर्मचारी इथे काम करतात. अलीकडेच मी कंपनीत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या नवीन उमेदवारांना सांगू लागलो की, ग्रेप्टाइलमध्ये वर्क-लाइफ बॅलन्स नाही. साधारणत: दररोज कर्मचाऱ्यांचे काम सकाळी 9 वाजता सुरू होते आणि रात्री 11 वाजता संपते. आम्ही शनिवारी आणि कधीकधी रविवारी देखील काम करतो.' त्यांचे ट्विट झपाट्याने व्हायरल झाले आणि आतापर्यंत त्याला 1.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

यानंतर, त्यांनी नुकतीच आणखी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, कंपनीच्या वर्क लाईफबद्दल सांगितल्यामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. 20 टक्के इनबॉक्स जीवे मारण्याच्या धमक्यांनी भरल्याचे दक्ष आपल्या पोस्टमध्ये सांगतात. त्यांच्या या पोस्टमुळे दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. काहीजण त्यांच्यावर टीका करत आहेत, तर काहीजण त्यांचे समर्थन करत आहेत.

टॅग्स :Americaअमेरिकाtechnologyतंत्रज्ञानIndiaभारत