शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या घरावर FBIचे छापे, १३ तास झडती; गोपनीय दस्तऐवज केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 05:51 IST

अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांच्या विल्मिंग्टन येथील निवासस्थानी १३ तास झडती घेतली

वॉशिंग्टन :

अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांच्या विल्मिंग्टन येथील निवासस्थानी १३ तास झडती घेतली. या ठिकाणाहून त्यांनी काही गोपनीय दस्तऐवज जप्त केले आहेत.

एफबीआयने बायडेन यांच्या काही हस्तलिखित नोट्सही ताब्यात घेतल्या आहेत. अध्यक्षांचे वकील बॉब बाउर यांनी ही माहिती दिली. बायडेन यांनी स्वेच्छेने एफबीआयला निवासस्थानी झडती घेण्याची परवानगी दिली. मात्र, वॉरंट नसतानाही घडलेली ही घटना असामान्य आहे. 

बायडेन हे पुन्हा निवडणुकीसाठी आपला दावा करण्याच्या तयारीत असताना एफबीआयने केलेली झडती बायडेन यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे. साधारणत: गोपनीय दस्तऐवज जास्तीत जास्त २५ वर्षांनी सार्वजनिक केले जातात. परंतु, काही नोंदी जास्त काळ गोपनीय ठेवल्या जातात. बायडेन यांनी १९७३ ते २००९ या काळात सिनेटर म्हणून काम केले आहे.

उपाध्यक्षपदाच्या काळातील कागदपत्रेबायडेन यांच्या निवासस्थानात आणि खासगी कार्यालयांमध्ये सापडलेल्या एकूण गोपनीय कागदपत्रांची संख्या आता सुमारे दीड डझन झाली आहे. ही सर्व कागदपत्रे २००९ ते २०१६ या काळात त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहेत. ही कागदपत्रे आता फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या ताब्यात आहेत. बायडेन यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे चुकीच्या ठिकाणी असल्याचे आम्हाला आढळले, त्यामुळे आम्ही ते तत्काळ न्याय विभागाकडे सोपविले.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडन