शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

"डोनाल्ड ट्रम्प हे एक धाडसी नेते"; राष्ट्राध्यक्षपदाच्या विजयानंतर पुतिन यांनी केलं तोडंभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 09:42 IST

Vladimir Putin Donald Trump, US Election 2024: ट्रम्प यांचा विजय हा अमेरिका आणि रशियामधील संबंध सुधारण्याची संधी ठरू शकतो असाही केला उल्लेख

Vladimir Putin Donald Trump, US Election 2024: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. अमेरिका आणि रशिया यांच्यातील राजकीय संबंध प्रचंड तणावपूर्ण असताना हे अभिनंदन करण्यात आले. विशेषत: रशियाविरूद्धच्या युद्धात अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. परंतु असे असूनही पुतिन यांनी एका कार्यक्रमात ट्रम्प यांचे अभिनंदन करत, ट्रम्प हे एक धाडसी नेते असल्याचे कौतुकोद्गार काढले.

पुतीन यांनी ट्रम्प यांच्या धाडसाचे कौतुक केले. एवढेच नाही तर जुलैमध्ये त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतरही त्यांनी जी लढाऊवृत्ती दाखवली त्याचेही कौतुक केले. 'मी ट्रम्प यांचा स्वभाव पाहिला आहे. त्यांनी खूप धाडस दाखवले. आपल्यावर जीवघेणा हल्ला होतो तेव्हा आपल्याला भीती वाटते. पण ट्रम्प यांनी धाडसाने आपली निवडणूक प्रचाराची मोहिम पुढे सुरुच ठेवली आणि विजय मिळवला,' अशा शब्दांत पुतिन यांनी ट्रम्प यांची स्तुती केली.

पुतिन यांनी असेही सांगितले की ते ट्रम्प यांच्याशी ते चर्चेसाठी तयार आहेत आणि अमेरिकेशी संबंध पूर्ववत करण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नाही, परंतु ते पूर्णपणे अमेरिकेच्या सरकारवर अवलंबून आहे. आम्ही रशियाच्या दिशेने पावले उचण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे रशिया-अमेरिका संबंध पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर, ट्रम्प यांनी मोठ्या स्विंग राज्यांमध्ये चमकदार कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले. ट्रम्प यांच्या या विजयानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले, त्यात पुतिन यांचे नाव सर्वात मोठे मानले जात आहे. बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही ट्रम्प यांचे अभिनंदन केले आणि व्हाईट हाऊसमध्ये सत्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत बोलले. याचदरम्यान, ट्रम्प यांचा विजय हा अमेरिका आणि रशियामधील संबंध सुधारण्याची संधी ठरू शकतो, असा विश्वास पुतिन यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :US ElectionAmerica ElectionVladimir Putinव्लादिमीर पुतिनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया