शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

US Elections 2020 : ‘’देश आणि समाजाला तोडणार नाही तर जोडणार’’, विजयानंतर बायडेन यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 10:33 IST

Joe Biden News : आक्रमक प्रचार, अटीतटीची झालेली निवडणूक आणि मतमोजणीदरम्यान निर्माण झालेल्या वादानंतर अखेर अमेरिकेच्या भावी अध्यक्षपदाची माळ डेमोक्रॅटिक पार्टीच्या जो बायडेन यांच्या गळ्यात पडली.

ठळक मुद्देमी असा राष्ट्राध्यक्ष बनेन जो देश आणि समाजाला तोडण्याचा नाही तर जोडण्याचा प्रयत्न करेल मी असा राष्ट्राध्यक्ष असेन जो अमेरिकेतील राज्यांना लाल आणि निळ्या रंगात पाहणार नाही तर संयुक्त राज्य अमेरिकेच्या रूपात पाहील आता आपापसातील मतभेद विसरून जाण्याची वेळ आली आहे. निवडणुकीमुळे वातावरण तापले होते. ते कमी करण्याची वेळ आली आहे

वॉशिंग्टन - आक्रमक प्रचार, अटीतटीची झालेली निवडणूक आणि मतमोजणीदरम्यान निर्माण झालेल्या वादानंतर अखेर अमेरिकेच्या भावी अध्यक्षपदाची माळ डेमोक्रॅटिक पार्टीच्या जो बायडेन यांच्या गळ्यात पडली. शनिवारी रात्री बायडेन यांना अधिकृतरीत्या विजयी घोषित करण्यात आले. जो बायडेन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बायडेन यांनी देशवासियांना संबोधित करताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मी समाजाला तोडणार नाही, तर जोडणार आहे, असे आश्वासन बायडेन यांनी दिले आहे.बायडेन म्हणाले की, मी तुम्हाला आश्वासन देतो की, ''मी असा राष्ट्राध्यक्ष बनेन जो देश आणि समाजाला तोडण्याचा नाही तर जोडण्याचा प्रयत्न करेल. मी असा राष्ट्राध्यक्ष असेन जो अमेरिकेतील राज्यांना लाल आणि निळ्या रंगात पाहणार नाही तर संयुक्त राज्य अमेरिकेच्या रूपात पाहील आणि पूर्ण क्षमता आणि कसोशीने जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल.'' 

अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना बायडेन म्हणाले की, आता आपापसातील मतभेद विसरून जाण्याची वेळ आली आहे. निवडणुकीमुळे वातावरण तापले होते. ते कमी करण्याची वेळ आली आहे. आता आपण पुन्हा एकदा एकमेकांना भेटले पाहिजे. तसेच एकमेकांचे ऐकले पाहिजे. ही वेळ अमेरिकेच्या जखमेवर मलम लावून फुंकर मारण्याची आहे.अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोण, याचे उत्तर अखेरीस शनिवारी स्पष्ट झाले. पेनसिल्व्हेनिया राज्यातील निर्णायक मते मिळवत जो बायडेन यांनी अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला २७० हा बहुमताचा आकडा गाठला. त्यांच्या खात्यात आता २८४ प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल व्होट्स) आहेत. तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. अजूनही काही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू असली तरी बायडेन हेच अमेरिकेच्या अध्यक्षपदी असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या २० जानेवारी रोजी बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण करतील.कोरोनाकहराने टोक गाठलेले असताना झालेली अध्यक्षीय निवडणूक चुरशीची झाली. सुरुवातीला आघाडी घेणारे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नंतर अनेक राज्यांमधून पिछाडीवर पडू लागले.  त्यामुळे सर्वांचे लक्ष जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, नेवाडा, अरिझोना आणि नॉर्थ कॅरोलायना या राज्यांमधील मतमोजणीकडे लागले होते. यापैकी नॉर्थ कॅरोलायना राज्यातच ट्रम्प यांना आघाडी मिळाली होती.उर्वरित सर्व राज्यांत बायडेन आघाडीवर होते. शनिवारी २० प्रातिनिधिक मते असलेल्या पेनसिल्व्हेनिया राज्यांत बायडेन यांनी विजय मिळवत आपली प्रातिनिधिक मतांची संख्या २८४ पर्यंत वाढवली आणि तिथेच ट्रम्प यांचा पराभव निश्चित झाला. दरम्यान, पराभव निश्चित होत असताना, मी ही निवडणूक जिंकलो असल्याचे ट्विट ट्रम्प यांनी करीत रडीचा डाव सुरूच ठेवला.  

 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनUS ElectionAmerica ElectionUnited Statesअमेरिका